भारताची उपांत्य फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

डर्बी - कर्णधार मिताली राजचे शानदार शतक, वेदा कृष्णमूर्तीची आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर स्पर्धेतला पहिलाच सामना खेळणाऱ्या राजेश्‍वरी गायकवाडने टिपलेले पाच बळी, यामुळे भारताने न्यूझीलंडचा १८६ धावांनी धुव्वा उडवला आणि महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 

पहिल्या चार सामन्यांत विजय आणि त्यानंतर दोन पराभव, यामुळे भारताच्या वाटचालीला ब्रेक लागला होता. उपांत्य फेरीसाठी आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे अनिवार्य होते. मिताली राजच्या संघाने न्यूझीलंडला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. २०१० नंतर कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारताने प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे.

मिताली राज (१०९), हमनप्रीत कौर (६०) आणि वेदा कृष्णमूर्ती (४५ चेंडूंत ७०) यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने २६५ धावा उभारल्या. त्यानंतर न्यूझीलंडला अवघ्या ७९ धावांत गुंडाळले. डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्‍वरीने १५ धावांत ५ विकेट मिळवल्या, तर दीप्ती शर्माने दोन विकेटचे योगदान दिले. इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

त्याआधी भारताने २६५ धावांपर्यंत मजल मारली. तीन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूनम राऊतने शतक केले होते. तिला मिताली राजने चांगली साथ दिली होती, तरीही भारताला पुरेशी धावसंख्या रचता आली नव्हती. आजचा सामना ‘आर या पार’ असा असल्यामुळे सलामीची जोडी झटपट बाद झाल्यावरही भारतीयांनी किमान अडीचशे धावांचे लक्ष्य ठरवले होते. ते साध्यही झाले. 

मितालीने आपली हुकमत सिद्ध केली. तिने ११ चौकारांसह १०९ धावांची खेळी केली. 

संक्षिप्त धावफलक
भारत - ५० षटकांत ७ बाद २६५ (मिताली राज १०९ -१२३ चेंडू, ११ चौकार, हर्मनप्रीत कौर ६०-९० चेंडू, ७ चौकार, वेदा कृष्णमूर्ती ७०-४५ चेंडू, ७ चौकार, २ षटकार, लिघ कास्प्रेक ३-४५, हॅना रो २-३०)  विवि न्यूझीलंड - २५.३ षटकांत सर्व बाद ७९ (सॅटरवेट २६, दीप्ती शर्मा २-२६, झूलन गोस्वामी १-१४, राजेश्‍वरी गायकवाड ५-१५)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news indian women cricket team in semi final