साईनाची सिंधूवर मात; इंतानोनला हरवून अंतिम फेरी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 January 2018

जाकार्ता (इंडोनेशिया) - इंडोनेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रजासत्ताक दिनी दोन फुलराण्यांमध्ये लढत झाली. त्यात सिनियर फुलराणी साईना नेहवालने ज्युनियर फुलराणी पी. व्ही. सिंधू हिच्यावर २१-१३, २१-१९ अशी मात केली. साईनाने मग शनिवारी अंतिम फेरी गाठताना रत्चानोक इंतानोन हिला हरविले. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या साईनाने चौथ्या स्थानावरील प्रतिस्पर्धीवर ४९ मिनिटांत  २१-१९, २१-१९ असा विजय मिळविला. साईनाने मोसमात पहिल्याच स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. साईनाने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. साईनासमोर अग्रमानांकित तैवानच्या ताई त्झू यिंग हिचे आव्हान असेल.

जाकार्ता (इंडोनेशिया) - इंडोनेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रजासत्ताक दिनी दोन फुलराण्यांमध्ये लढत झाली. त्यात सिनियर फुलराणी साईना नेहवालने ज्युनियर फुलराणी पी. व्ही. सिंधू हिच्यावर २१-१३, २१-१९ अशी मात केली. साईनाने मग शनिवारी अंतिम फेरी गाठताना रत्चानोक इंतानोन हिला हरविले. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या साईनाने चौथ्या स्थानावरील प्रतिस्पर्धीवर ४९ मिनिटांत  २१-१९, २१-१९ असा विजय मिळविला. साईनाने मोसमात पहिल्याच स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. साईनाने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. साईनासमोर अग्रमानांकित तैवानच्या ताई त्झू यिंग हिचे आव्हान असेल. ताईने आठव्या मानांकित चीनच्या ही बिंगजियाओला २१-१८, २१-१४ असे हरविले.

पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांची वाटचाल खंडित झाली. ही जोडी ३२ व्या स्थानावर आहे. अव्वल स्थानावरील इंडोनेशियाच्या मार्क फेर्नाल्डी गिडेऑन-केव्हीन संजया सुकामुल्जो यांच्याकडून ते ३० मिनिटांत १४-२१, १११-२१ असे हरले. इंडोनेशियाच्या जोडीने गेल्या मोसमात सात सुपर सिरीज स्पर्धा जिंकल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news indonetians masters badminton competition