आयपीएल ‘रिटेशन’ची लॉटरी आज जाहीर होणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 January 2018

मुंबई - भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका मोहिमेची अग्निपरीक्षा देण्यास सज्ज होत असताना इकडे भारतात आयपीएलचे संघमालक आपल्या संघात कोणाकोणाला कायम ठेवायचे याची खलबते करत आहेत. उद्या, गुरुवारी (ता. ४) कुठल्या संघाने कुणाला कायम ठेवले याची अधिकृत घोषणा होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स त्यांना दोनदा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार गौतम गंभीरला प्रथम क्रमांकाची पसंती देणार नसल्याचे समजते.

उद्या मुंबईत आयपीएलचा यंदाच्या मोसमातला पहिला कार्यक्रम होत आहे. यात खेळाडू रिटेशन (संघात कायम ठेवले जाणारे खेळाडू) जाहीर केले जाणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुन्हा आयपीएलमध्ये येत असल्यामुळे हे संघ कोणकोणत्या खेळाडूंना आपल्या संघात दोन वर्षांनंतरही कायम ठेवण्यासाठी पसंती देतील याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा आणि पंड्या बंधूंना पसंती दिल्याचे समजते, तर महेंद्रसिंह धोनीवर पुन्हा चेन्नई सुपर किंगची धुरा असेल; मात्र शाहरुख खान आणि जूही चावला यांच्या कोलकता नाईट रायडर्सने कर्णधार गौतम गंभीरऐवजी ख्रिस लीनला प्राधान्य दिले आहे; परंतु याचा अर्थ गंभीरला दुर्लक्षित करणार असे नाही. राईट टू मॅच या पद्धतीने किंवा लिलावात ते गंभीरला पुन्हा आपल्या संघात घेण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

फ्रॅंचाईजी जेवढ्या जास्त खेळाडूंना रिटेन करणार तेवढे जास्त पैसे त्यांना खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे लिलावात खेळाडू घेताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना कायम ठेवताना संघ मालक हातचे राखूनच निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

रिटेशन खेळाडूंची संभाव्य यादी
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक आणि कृणाल पंड्या
चेन्नई सुपर किंग - महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
कोलकता - ख्रिस लीन
सनरायर्झ हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा
दिल्ली डेअरडेव्हिल्स - रिषभ पंत, श्रेयस अय्यर
राजस्थान रॉयल्स - स्टीव स्मिथ
किंग्ज इलेव्हन पंजाब - कोणीही नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news IPL 2018 Player Retention and Right to Match Rules list salary cap and process explained