आयपीएल लिलावात हजारवर खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 January 2018

हे लिलावात
 लिलावात एकंदर १ हजार १२२ खेळाडू
 आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेले ८३८ खेळाडू
 यापैकी ७७८ भारतीय, 
 परदेशातील २८२ खेळाडू, त्यात ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक ५८; तर आफ्रिकेतील ५७
 लिलावात अफगाणिस्तान, आयर्लंड या कसोटी दर्जा मिळालेल्या देशातील खेळाडूही. 
 या लिलावात अमेरिका, स्काटलॅंडचाही सहभाग
 पायाभूत रक्कम दोन कोटी असलेल्या ३६ खेळाडूंत १३ भारतीय

मुंबई - इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधील लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाली  असून त्यात हजारहून जास्त खेळाडू आहेत. आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी लिलाव २७ आणि २८ जानेवारीस बंगळूरला होणार आहे. 

या लिलावात जगभरातील खेळाडू आहेत. त्यात अर्थातच युवराज सिंग, गौतम गंभीर, आर अश्विन, अजिंक्‍य रहाणे यांना जास्त भाव मिळण्याची  शक्‍यता आहे. त्याचबरोबर  कुलदीप यादव, केएल राहुल, मुरली विजय, हरभजन सिंग यांना किती किंमत लाभते,  याकडेही लक्ष असेल.  आंतरराष्ट्रीय खेळाडूत ख्रिस गेल आणि बेन स्टोक्‍स आहेत.  इंग्लंड कर्णधार जो रुट प्रथमच या लिलावात असेल. यापूर्वी केवळ इऑन मॉर्गन, केविन पीटरसन, जेसन रॉय, सॅम बिलिंग्ज आणि स्टोक्‍स हेच इंग्लंडचे खेळाडू आयपीएल खेळले आहेत.  सर्वाधिक पायाभूत रक्कम दोन कोटी असलेल्या खेळाडूत धवन, रहाणे, विजय यांच्यासह युझवेंद्र चाहल, केदार जाधव, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्पा आहेत.

गतस्पर्धेत चमक दाखवून बासील थंपी, कृणाल पंड्या यांची पायाभूत रक्कम अनुक्रमे तीस आणि चाळीस लाख आहे. थंपीची गतवर्षी गुजरात लायन्सने ८५ लाखास खरेदी केली होती. त्याने त्या वेळी ११ विकेट घेतल्या होत्या. 

देश    संख्या
अफगाणिस्तान    १३
ऑस्ट्रेलिया    ५८
बांगलादेश    ८
इंग्लंड    २६
आयर्लंड    २
न्यूझीलंड    ३०
स्कॉटलंड    १
द. आफ्रिका    ५७
श्रीलंका    ३९
अमेरिका    २
वेस्ट इंडीज    ३९
झिंबाब्वे    ७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news IPL auction