‘आयपीएल’ची सुरवात व शेवट मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 January 2018

नवी दिल्ली - टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय ‘आयपीएल’चे अकरावे पर्व यंदा ७ एप्रिलला सुरू होणार असून, २७ मेपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेची सुरवात आणि शेवट मुंबईतच होणार आहे.

‘आयपीएल’ कार्यकारी समितीने सोमवारी या कार्यक्रमाची माहिती जाहीर केली. ‘आयपीएल’च्या या घोषणेमुळे खेळाडूंचा लिलाव होण्यापूर्वीच लीगविषयीचे वातावरण निर्माण होण्यास सुरवात झाली आहे.

वेळेत बदल
यंदा सामन्यांच्या वेळेतही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थेट प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीकडून तशा प्रकारची विनंती करण्यात आल्यामुळे हा बदल करण्यात आला. गेल्या वर्षीपर्यंत सामने दु. ४ आणि रात्री ८ वाजता सुरू व्हायचे. आता या वर्षीपासून सामने ५.३० आणि सात वाजता सुरू होतील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ipl start and end in mumbai