आयपीएलचा फायदा होईल - फॉकनर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 September 2017

चेन्नई - आयपीएल तसेच भारतात झालेल्या ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळल्याचा फायदा आम्हाला निश्‍चितच होईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू जेम्स फॉकनरने सांगितले. भारत दौऱ्यावर मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्यास आलेल्या ऑस्ट्रेलियाचा उद्या अध्यक्षीय संघाविरुद्ध सराव सामना होत आहे.

आमच्या संघातील बहुतेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धा खेळल्याचा अनुभवही पाठीशी आहे. त्याच वेळी आता भारतीय संघानेही श्रीलंकेत घवघवीत यश मिळवलेले आहे. त्यामुळे आमच्या कौशल्याचा कस लागणार आहे, असे फॉकनर म्हणाला.  

२०१५ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदामध्ये महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या फॉकनरचे त्यानंतर  संघातले स्थान पक्के नव्हते. या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतूनही त्याला वगळण्यात आले होते; परंतु भारत दौऱ्यासाठी त्याला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करून आपली उपयुक्तता सिद्ध करायची आहे, असे त्याने सांगितले.

जेव्हा तुम्ही संघाबाहेर जाता तेव्हा पुन्हा संघात येणे कठीण झालेले असते. मी चार महिने संघापासून दूर होतो, सरावातून आता मी अधिक सक्षम आणि तंदुरुस्त झालो आहे, असे त्याने सांगितले.

भारतात आम्हा सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खेळायला आवडते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट द्वंद्व चांगलेच रंगते. येथील प्रेक्षकही चांगले दर्दी आहेत. त्यामुळे भारतात खेळण्याचा वेगळाच आनंद मिळत असतो, असे फॉकनरने नमूद केले. 

या मालिकेत कोणती बाजू ऑस्ट्रेलियासाठी जमेची ठरू शकेल, या प्रश्‍नावर फॉकनर म्हणतो, काही खेळाडूंमध्ये असलेली अष्टपैलू गुणवत्ता; तसेच फलंदाजी आणि गोलंदाजीतील प्रबळता आम्हाला येथे यश देऊ शकते. 
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी सलामीचा आक्रमक फलंदाज ॲरॉन फिंच याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
आयपीएल स्टार्सना संधी
उद्या होणाऱ्या सामन्यासाठी अध्यक्षीय संघात आयपीएलमध्ये चमकलेल्या राहुल त्रिपाठी, नितीश राणा, मयांक अगरवाल, वॉशिंग्टन सुंदर, संदीप शर्मा अशा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. निवड समितीसमोर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची या खेळाडूंना संधी असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news The IPL will benefit