दिल्ली प्रदूषणाचा त्रास आयएसएल संघांनाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 December 2017

नवी दिल्ली - श्रीलंका संघातील खेळाडूंनी रविवारी मास्क घालून क्षेत्ररक्षण केल्यावर प्रदूषणाचा त्रास त्यांनाच कसा होतो, मैदानातील वीस हजार प्रेक्षकांना कसा होत नाही, अशी विचारणा भारतीय क्रिकेट मंडळाने केली होती. त्यांना जणू आयएसएलमधील संघातील खेळाडूंनी मास्क घालून सराव करीत उत्तर दिले.

दिल्ली डायनॅमोज आणि जमशेदपूर एफसी या संघांमध्ये बुधवारी आयएसएलची लढत होईल. सराव करताना दिल्ली संघातील काही खेळाडूंनीच मास्क परिधान केले होते. आमचे खेळाडू सामन्याच्या वेळी मास्क वापरणार नाहीत, असे दिल्लीचे मार्गदर्शक मिगुएल अँगेल पोर्तुगाल यांनी सांगितले. मात्र त्याच वेळी खेळाडूंनी हे वापरण्याचे ठरवले, तर मी विरोध करणार नाही, असे त्यांनी सांगितले. जमशेदपूरचे मार्गदर्शक स्टीव कॉपेल म्हणाले, या कालावधीत दिल्लीत लढतीच घेणे चुकीचे आहे. गेली तीन वर्षे मी याच सुमारास दिल्लीत येतो, त्या वेळी प्रदूषणाबाबत खूप काही कानावर पडते. गतवर्षीही मी प्रदूषणात लढती नकोत, असे सांगितले होते. काही तरी कॉमन सेन्स हवा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ISL teams suffer from Delhi pollution