जेमिमाचे वन-डे सामन्यात द्विशतक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 November 2017

मुंबई - मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जने पश्‍चिम विभागीय १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत द्विशतक करण्याचा पराक्रम केला. १७ वर्षांची असताना भारतीय राष्ट्रीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झालेल्या जेमिमाचे स्पर्धेतील तीन सामन्यांतील हे दुसरे शतक आहे.

जेमिमाने औरंगाबादला सुरू असलेल्या या स्पर्धेत सौराष्ट्रविरुद्ध नाबाद द्विशतक केले. केवळ १९ वर्षांखालीलच नव्हे, तर २३ वर्षांखालील संघाची कर्णधार असलेल्या जेमिमाने या मोक्‍याच्या लढतीत मुंबईला २८५ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. तिने १२४ च्या स्ट्राईक रेटने मुंबईला साडेतीनशेच्या नजीक नेले होते. 

राष्ट्रीय १९ वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेत द्विशतक करणारी जेमिमा ही दुसरी खेळाडू. अद्यापही या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम राष्ट्रीय सलामीवीर स्मृती मानधना हिच्या नावावर आहे. तिने महाराष्ट्राकडून खेळताना गुजरातविरुद्ध १५० चेंडूंत २२४ धावा केल्या होत्या. 

संक्षिप्त धावफलक - 
मुंबई - ५० षटकात २ बाद ३४७ (जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद २०२ - १६३ चेंडूंत २१ चौकार, एस. के. राऊत धावचीत ९८ - ११४ चेंडूंत २ चौकार) वि. वि. सौराष्ट्र ः ३९.४ षटकांत ६२ (मेघना जाम्बुचा २५, सायली वाघमारे ३-२०, जान्हवी काटे२-१९, फातिमा जाफर १०-५-१०-२).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news jemima double century in one day cricket match