esakal | कुलदीप यादवची हॅटट्रिक 
sakal

बोलून बातमी शोधा

कुलदीप यादवची हॅटट्रिक 

कुलदीप यादवची हॅटट्रिक 

sakal_logo
By
पीटीआय

कोलकाता - चायनामन गोलंदाज म्हणून आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या कुलदीप यादवने ऐतिहासिक ईडन गार्डनवर हॅटट्रिक करण्याचा पराक्रम केला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी पाच सामन्यांच्या मालिकेतील विजयाची दुसरी माळ गुंफली. हा दुसरा सामना 50 धावांनी जिंकून भारताने 2-0 आघाडी घेतली. 

प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 92 धावांनंतरही अडीचशे धावा करताना दमछाक झालेल्या भारताने ऑस्ट्रेलियाला 202 धावांत गुंडाळले. कुलदीप यादव एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक करणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. या अगोदर चेतन शर्मा आणि कपिलदेव यांनी ही कामगिरी केली आहे. 

कुलदीपने स्वतःच्या नवव्या आणि डावातील 33 व्या षटकात हा पराक्रम केला. त्याने मॅथ्यू वेड, ऍस्टन ऍगर आणि कमिन्स यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले. त्या अगोदर ऑस्ट्रेलियाने दोन बाद 9 अशा खराब सुरवातीनंतर चार बाद 138 अशी मजल मारली होती. मॅक्‍सवेलने पहिल्या सामन्याप्रमाणे आजही कुलदीपवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला पुन्हा एकदा चहलने बाद केले. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ मैदानात असेपर्यंत पाहुण्यांचेही आव्हान कायम होते. त्याने 59 धावा करताना एक बाजू लढवली होती. पंड्याच्या चेंडूवर त्याचा झेल राखीव खेळाडू रवींद्र जडेजाने टिपला आणि भारतासाठी विजयाचा मार्ग खुला झाला. त्यानंतर कुलदीपच्या हॅटट्रिकने विजयाची केवळ औपचारिकताच बाकी राहिली होती. 

ऑस्ट्रेलिया ः 43.1 षटकांत सर्वबाद 202 (स्टीव स्मिथ 59- 76 चेंडू, 8 चौकार, ट्रॅव्हिस हेड 39 -39 चेंडू, 5 चौकार, स्टोनिस नाबाद 62- 65 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, भुवनेश्‍वर कुमार 6.1-2-9-3, हार्दिक पंड्या 10-0-56-2, युजवेंद्र चहल 10-1-34-2, कुलदीप यादव 10-1-54-3). 

loading image