पांडे, नायर ‘अ’ संघांचे कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत, ईशान किशनला पसंती

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ‘अ’ संघाच्या एकदिवसीय आणि चार दिवसांच्या सामन्यांसाठी अनुक्रमे मनीष पांडे आणि करुण नायर यांची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये छाप पाडणाऱ्या कृणाल पंड्या आणि रणजी मोसम गाजविणाऱ्या गुजरातच्या प्रियांक पांचाळ यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 

संघातील महत्त्वाच्या यष्टिरक्षकाच्या जागेसाठी एकदिवसीय सामन्याकरता रिषभ पंत आणि चार दिवसांच्या सामन्यासाठी इशान किशन यांचा समावेश करण्यात आला आहे. करुण नायरला दोन्ही संघात स्थान मिलाले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला भारतीय वरिष्ठ संघातून वगळले जाणार हे निश्‍चित. चॅंपियन्स करंडक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळालेल्या पण, दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागलेल्या मनीष पांडेला कर्णधार करताना त्याच्याकडे फलंदाजीतील आधारस्तंभ म्हणून बघितले जात आहे. एकदिवसीय संघ प्रथम २६ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या ‘अ’ संघांच्या तिरंगी मालिकेत खेळेल. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे मालिकेतील अन्य दोन संघ असतील. 
सलामीच्या जोडीसाठी रणजी मोसमात धावांते रतीब टाकणाऱ्या प्रियांक पांचाळ आणि अभिनव मुकुंद यांना स्थान मिळाले आहे. चार दिवसांच्या सामन्यासाठी महाराष्ट्राच्या अंकित बावणेला स्थान मिळाले आहे.

भारतीय संघ
एकदिवसीय - मनीष पांडे (कर्णधार), मनदीप सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, करुण नायर, कृणाल पंड्या, रिषभ पंत (यष्टिरक्षक), विजय शंकर, अक्षर  पटेल, युजवेंद्र चहल, जयंत यादव, बसिल थम्पी, महंमद सिराज, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल. 

कसोटी संघ - करुण नायर (कर्णधार), पी. के. पांचाळ, अभिनव मुकुंद, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, सुदीप चॅटर्जी, इशान किशन (यष्टिरक्षक), हनुमा विहारी, जयंत यादव, शाहबाज नदीम, नवदीप सैनी, महंमद सिराज, शार्दूल ठाकूर, अंकित चौधरी, अंकित राजपूत.

Web Title: sports news manish pande & karan nair a team captain