सलामीवीरांच्या अपयशाची मालिका चिंताजनक

पीटीआय
सोमवार, 10 जुलै 2017

लिस्टर - सलामीवीरांची अपयशाची मालिका भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची डोकेदुखी झाली आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातील आक्रमक शतकी सलामीनंतर सलग चार लढतीत पूनम राऊत - स्मृती मानधना ही जोडी अपयशी ठरली आहे. 

लिस्टर - सलामीवीरांची अपयशाची मालिका भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची डोकेदुखी झाली आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातील आक्रमक शतकी सलामीनंतर सलग चार लढतीत पूनम राऊत - स्मृती मानधना ही जोडी अपयशी ठरली आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शतकी पराभवाने खंडित झाली. त्यातच आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत नजीक येत आहे. ‘विंडीजविरुद्धच्या लढतीपासून भारतीय संघाला अपेक्षित सुरवात मिळालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या जोरदार सुरवातीनंतर फार तर एखाद दोन लढतीत ही जोडी अपयशी ठरेल, असे वाटले होते; पण हे सलग चार सामन्यांत घडले आहे. प्रथम फलंदाजी असो वा धावांचा पाठलाग, भक्कम सलामी महत्त्वाची असते. त्यामुळे दडपण कमी होण्यास मदत होते. पावणेतीनशेच्या आसपास लक्ष्य असताना तर हे आवश्‍यक होते,’ असे मितालीने सांगितले.

आफ्रिकेविरुद्ध पूनमने २२; तर स्मृतीने चार धावा केल्या. त्यांची जोडी दुसऱ्याच षटकात फुटली होती. इंग्लंडविरुद्धच्या १४४ धावांच्या सलामीनंतर विंडीजविरुद्ध ०, पाकविरुद्ध ७, तर श्रीलंकेविरुद्ध २१ धावाच सलामीत झाल्या. खरे तर आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय चुकला. गेल्या चार सामन्यात प्रभावी ठरलेल्या एकता बिश्‍त आणि दीप्ती शर्मा या फिरकी दुकलीवर आफ्रिकेने हल्ला केला. 

लिस्टरला धावांचा पाठलाग करणे सोपे असते, असे आम्हाला सांगण्यात आले होते. आफ्रिकेविरुद्धच्या यापूर्वीच्या लढतीत आम्ही २६० च्या आसपास धावा सातत्याने केल्या होत्या, असे मितालीने सांगितले. त्याचबरोबर लिझेल ली हिची ६५ चेंडूंतील ९२ धावांची खेळी निर्णायक ठरल्याचे मितालीने नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news mitali raj women cricket