महाराष्ट्राने विजयाची संधी घालवली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 January 2018

राजकोट - महाराष्ट्राने पश्‍चिम विभागीय टी-२० करंडक क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्राविरुद्ध विजयाची संधी घालवली. सौराष्ट्राने चार धावांनी बाजी मारली.  

महाराष्ट्रासमोर १४३ धावांचे आव्हान होते. अखेरच्या षटकात महाराष्ट्राला १२ धावांची गरज होती. शौर्य सनदिया याने हे षटक टाकले. त्या वेळी पहिल्या सामन्यातील विजयात मोलाची खेळी केलेला निखिल नाईक मैदानावर होता, पण पहिल्याच चेंडूवर स्कूपच्या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला. 

नवा फलंदाज दिव्यांग हिंगणेकरने चौकारावर खाते उघडले. मग तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. त्यानंतर प्रयाग भाटीला वाइड पडला. त्या वेळी तीन चेंडूंत सहा धावा असे समीकरण होते. भाटीने एक धाव घेतली. त्यानंतर दिव्यांगला सनदियाने ‘डॉट बॉल’ टाकला. अखेरच्या चेंडूवर किमान ‘टाय’साठी चौकार अनिवार्य असताना हिंगणेकरचा त्रिफळा उडाला.

महाराष्ट्राने बिनबाद ६० अशी सुरवात केली होती, पण चुडासामाने पाठोपाठच्या षटकांत जम बसलेली सलामीची जोडी फोडली. त्यानंतर धावगतीला खीळ बसला.

त्याआधी सौराष्ट्राने ९ बाद १४२ धावा केल्या. यात प्रेरक मांकडचा मोठा वाटा होता. महाराष्ट्राने अंतिम टप्यात धावगतीला आळा घातला होता, पण अखेरीस आव्हान जास्त ठरले.

सौराष्ट्राने पहिलाच सामना जिंकला, तर महाराष्ट्राची कामगिरी एक विजय-एक पराभव अशी समान झाली. बडोद्यानेही एक विजय मिळविला आहे. मुंबईची सुद्धा एक विजय-एक पराभव अशी कामगिरी आहे. त्यामुळे पाच पैकी चार संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत.

संक्षिप्त धावफलक - सौराष्ट्र - २० षटकांत ९ बाद १४२ (रॉबिन उथप्पा १६, प्रेरक मांकड ३४-२६ चेंडू, २ चौकार, १ षटकार, जयदेव उनडकट १८-१५ चौकार, १ षटकार, समद फल्ला १-२४, डॉमनिक मुथ्थुस्वामी २-२७, श्रीकांत मुंढे २-२७, जगदीश झोपे २-२७, दिव्यांग हिंगणेकर १-३४) वि.वि. महाराष्ट्र - २० षटकांत ७ बाद १३८ (ऋतुराज गायकवाड ४१-२७ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, राहुल त्रिपाठी २०-२३ चेंडू, १ चौकार, १ षटकार, नौशाद शेख २४-१८ चेंडू, २ चौकार, निखिल नाईक १८-१८ चेंडू, १ चौकार, मुंढे १०-८ चेंडू, १ चौकार, उनडकट १-३२, शौर्य सनदिया २-३७, युवराज चुडासामा २-२६)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news mushtaq ali t-20 cricket competition