मुश्‍ताक अली टी-२० स्पर्धेसाठी केदार जाधव महाराष्ट्राचा कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 January 2018

पुणे - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सईद मुश्‍ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व तंदुरुस्त केदार जाधवकडे सोपविण्यात आले आहे.

आयपीएलमधून नावारुपाला आलेला राहुल त्रिपाठी उपकर्णधार असेल. रणजी संघात नसलेला आक्रमक शैलीचा फलंदाज विजय झोलचा या वेळी समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज डॉमिनिक मुथ्थुस्वामी याचेही संघात पुनरागमन झाले आहे. महाराष्ट्राचे सामने - वि. गुजरात, ७ जानेवारी, वि. सौराष्ट्र ८ जानेवारी, वि. मुंबई, वि. बडोदा १३ जानेवारी.

संघ - केदार जाधव (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), अंकित बावणे, स्वप्निल गुगळे, विजय झोल, ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख, निखिल नाईल (यष्टिरक्षक), प्रयाग भाटी, दिव्यांग हिंगणेकर, शमशुझमा काझी, डॉमिनिक मुथ्थुस्वामी, सत्यजित बच्छाव, जगदीश झोपे, श्रीकांत मुंढे, समद फल्ला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news mushtaq ali t-20 cricket competition kedar jadhav maharashtra captain