esakal | दक्षिण आफ्रिका संघात दोन नवे वेगवान गोलंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण आफ्रिका संघात दोन नवे वेगवान गोलंदाज

दक्षिण आफ्रिका संघात दोन नवे वेगवान गोलंदाज

sakal_logo
By
रॉयटर्स

केप टाऊन - दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या गोलंदाजांच्या ताफ्यात दोन नव्या वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. येत्या शनिवारपासून (ता.१३) सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी डुआने ऑलिव्हर आणि लुंगी एन्गिडी यांचा समावेश आहे. टाचेच्या दुखापतीमुळे डेल स्टेन खेळू शकणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. खांद्याच्या दुखापतीतून बरे झाल्यावर १४ महिन्यांनी पुनरागमन करणाऱ्या स्टेनला लगेचच क्रिकेटपासून दूर व्हावे लागले आहे. श्रीलंकेविरुद्ध एक वर्षापूर्वी पदार्पण करणारा ऑलिव्हर पाच कसोटी सामने खेळला असून, त्याने १७ गडी बाद केले आहे. एकवीस वर्षीय एन्गिडी तीन आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळला असला, तरी तो अजून कसोटी सामना खेळलेला नाही. पहिल्या कसोटी वेगवान गोलंदाजांच्या बळावरच दक्षिण आफ्रिकेने भारतावर विजय मिळविला. या पार्श्‍वभूमीवर ही निवड अपेक्षित मानली जात आहे.

loading image
go to top