दुसऱ्या डावात विंडीजचा न्यूझीलंडला कडवा प्रतिकार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 December 2017

वेलिंग्टन - पहिल्या डावात नांगी टाकल्यानंतर वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावांत न्यूझीलंडला चांगलेच झुंजवले. न्यूझीलंडने पहिला डाव ९ बाद ५२० धावसंख्येवर घोषित केल्यानंतर तिसऱ्या दिवस अखेरीस वेस्ट इंडीजने दुसऱ्या डावांत २ बाद २१४ अशी संयमी सुरवात केली. पहिल्या डावात ३८६ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर विंडीजला दुसऱ्या डावात क्रेग ब्रेथवेट आणि शिमरॉन हेटमेयर यांनी सावरून घेतले. ब्रेथवेट नाबाद असला तरी, विंडीज अजून १७२ धावांनी पिछाडीवर आहे. उद्या ब्रेथवेटला सहकाऱ्यांकडून किती साथ मिळते, यावरच त्यांचे आव्हान अवलंबून रहाणार आहे.

वेलिंग्टन - पहिल्या डावात नांगी टाकल्यानंतर वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावांत न्यूझीलंडला चांगलेच झुंजवले. न्यूझीलंडने पहिला डाव ९ बाद ५२० धावसंख्येवर घोषित केल्यानंतर तिसऱ्या दिवस अखेरीस वेस्ट इंडीजने दुसऱ्या डावांत २ बाद २१४ अशी संयमी सुरवात केली. पहिल्या डावात ३८६ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर विंडीजला दुसऱ्या डावात क्रेग ब्रेथवेट आणि शिमरॉन हेटमेयर यांनी सावरून घेतले. ब्रेथवेट नाबाद असला तरी, विंडीज अजून १७२ धावांनी पिछाडीवर आहे. उद्या ब्रेथवेटला सहकाऱ्यांकडून किती साथ मिळते, यावरच त्यांचे आव्हान अवलंबून रहाणार आहे. संक्षिप्त धावफलक - वेस्ट इंडीज १३४ आणि २ बाद २१४ (ब्रेथवेट खेळत आहे ७९, हेटमेयर ६६, होप खेळत आहे २१) न्यूझीलंड पहिला डाव ९ बाद ५२० घोषित (ब्लंडेल नाबाद १०७, ग्रॅंडहोम १०५, टेलर ९३, निकोल्स ६७).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news newzeland & west indies test cricket competition