आमची मेहनत ऑलिंपिकपटूंच्या तुलनेत क्षुल्लक - सेहवाग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई - ‘उम्मीद इंडिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या ऑलिपिक खेळाडूंच्या व्यथा आणि कथा जवळून ऐकण्याची संधी मिळाली. मेहनतीच्या तुलनेत आम्ही त्यांच्या जवळपासही नाही, असे स्पष्ट मत माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले.

आपल्या मनाप्रमाणे तुफानी फटकेबाजी करण्याची हुकूमत असलेला सेहवाग स्पष्टवक्ता म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याचे ट्‌विट अनेकांना कधी कधी घायाळ करतात, तर खिल्ली उडविणारे असतात. हा सेहवाग एपीक टीव्हीवर ‘उम्मीद इंडिया’ या कार्यक्रमातू सेहवाग, साक्षी मलिक, द्युती चंद, विनेश पोघट, दत्तू भोकनाळ, अपंग जलतरणपटू सुयश यादव आदींचे जीवनपट उलगटणार आहे.

एकूण १३ खेळाडूंच्यी जीवनावर आधारित असलेल्या या कार्यक्रमाचे काही भाग चित्रीत झाले आहेत, त्यासाठी मी खेळाडूंना भेटलो तेव्हा हे खेळाडू करत असलेली मेहनत किती प्रचंड आहे हे कळले. त्यातुलनेत आम्ही काहीच मेहनत घेत नसतो, असे तो म्हणाला. साक्षी मलिकला मी लखनौच्या साई शिबिरात भेटलो तेव्हा तिचा दिवस सकाळी ५.३० वाजता सुरू होतो. ९.३० पर्यंत पहिला सराव आणि त्यानंतर स्वतःचेच जेवण स्वतःच तयार करताना तिला पाहिले. अशा खेळाडूंकडून आपण ऑलिंपिक पदकांची अपेक्षा करतो तेव्हा त्यांना पुरेशा सुवीधा मिळत नसल्याची जाणीव होते.

आपल्याकडे अशा खेळाडूंना ६०० रुपये भत्ता दिला जातो. आताच्या युगात एवढ्या रुपयात पौष्टिक आहार कसा मिळणार? ऑलिंपिकसारख्या खेळात एका एका सेकंदाची स्पर्धा असते, तेथे आपले भवितव्य कसे असेल, असा सराव सेहवागने उपस्थित केला.

एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अगोदर परदेशात सराव करण्याची संधी आपल्या खेळाडूंना दिली पाहिजे. चांगला पौष्टिक आहार आणि योग्य प्रशिक्षण मिळाले तर जो दोन-तीन सेकंदाचा फरक राहतो तो राहणार नाही, असे सांगून सेहवाग म्हणाला, की आपल्याकडील सराव शिबिरातील सुविधांचाही आढावा घेतला पाहिते. मुळात आपला देश उष्ण कटिबंधातला आहे. वाढता उन्हाळा, वीजपुरवठ्याच्या अडचणी अशा प्रतिकूल परिस्थितीत आपले खेळाडू सराव करत आहेत हे पाहून दुःख होते, अशी कळकळ सेहवागने व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Our effort is trivial compared to the Olympians