न्यूझीलंडवरील विजयाने ‘टी-२०’मध्ये पाक अव्वल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 January 2018

माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून जागतिक ट्‌वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. पाकने निर्णायक लढतीत १८१ धावांचे संरक्षण करताना न्यूझीलंडला ६ बाद १६३ असे रोखले आणि मालिका विजयासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले.

माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून जागतिक ट्‌वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. पाकने निर्णायक लढतीत १८१ धावांचे संरक्षण करताना न्यूझीलंडला ६ बाद १६३ असे रोखले आणि मालिका विजयासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले.

सर्फराज अहमदच्या पाक संघाने पहिली लढत गमावली होती; पण दुसरी लढत ४८ धावांनी जिंकत पाकने बरोबरी साधली. पाकने दुसरी लढत १८ धावांनीच जिंकली असली, तरी किवींना कधीही आव्हान निर्माण करता आले नाही. पाकविरुद्धची दुसरी ट्‌वेंटी-२० लढत गमावण्यापूर्वी किवींनी सलग तेरा सामने जिंकले होते. त्यात पाक; तसेच विंडीजविरुद्धच्या विजयाचा समावेश होता; पण पाकने मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत न्यूझीलंडला मागे सारत जागतिक ट्‌वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले.

पाकिस्तानने १२६ गुणांसह अव्वल स्थान मिळवले; तर न्यूझीलंडचे १२३ गुण आहेत. किवींनी वेस्ट इंडीजला हरवून अव्वल क्रमांक मिळविला होता. भारत १२१ गुणांसह तिसरा आहे; तर त्यापाठोपाठ इंग्लंड (११९), वेस्ट इंडीज (११५), दक्षिण आफ्रिका (११२) आणि ऑस्ट्रेलिया (१११) आहेत. किवींना तिरंगी ट्‌वेंटी-२० स्पर्धेद्वारे (ऑस्ट्रेलिया व इंग्लंड) अग्रस्थान पुन्हा मिळवण्याची संधी आहे. 

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना झमनच्या फटकेबाजीने ६ बाद १८१ धावा केल्या. न्यूझीलंडसाठी धावांचा पाठलाग शक्‍य होता. मार्टिन गुप्टिलही फॉर्मात होता; पण तो बाद झाला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या डावास खिळ बसली. पाकिस्तानकडून शदाबने १९ धावांत २ गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक -
पाकिस्तान - ६ बाद १८१ (झमन ४६, सर्फराज २९, सॅंटनर २-२४) वि. वि. न्यूझीलंड - ६ बाद १६३ (गुप्टील ५९, टेलर २५, शदाब २-१९).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news pakistan topper in t 20 cricket competition