पृथ्वी शॉ भारताचा कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 December 2017

मुंबई - रणजी क्रिकेटमध्ये शतकांवर शतके करत असलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉची १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा न्यूझीलंडमध्ये १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. पंजाबचा शुभम गिल उपकर्णधार आहे. पृथ्वी आणि  शुभम हे दोघेही नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील आशियाई करंडक स्पर्धेत खेळले नव्हते.

आत्तापर्यंतच्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने प्रभाव पाडलेला आहे. २०००, २००८ आणि २०१२ मध्ये विजेतेपद मिळवलेले आहे. संघ - पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभम गिल (उपकर्णधार), मनजोत कार्ला, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रेयान पराग, आर्यन ज्युयेल (यष्टिरक्षक), हार्विक देसाई (यष्टिरक्षक), कमलेश नागरकोटी, इशान पोरल, अर्षदीप सिंग, अनुकूल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news prithvi shaw indian captain