द्रविडच्या निर्णयाने सपोर्ट स्टाफला न्याय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 February 2018

नवी दिल्ली - केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही सभ्य खेळाडू म्हणून संपूर्ण क्रिकेटविश्‍वात प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने आपल्या सभ्यतेचे आणि कृतिशीलतेचे आणखी एक उदाहरण जगासमोर ठेवले. त्यासाठी स्वतःला मिळणाऱ्या रकमेतील २५ लाख कमी झाले, तरी त्याची त्याला पर्वा नव्हती.

भारताच्या ज्युनियर संघाला घडवण्याचे काम मुख्य प्रशिक्षक या नात्याने करत असणाऱ्या द्रविडने १९ वर्षांखालील संघाला विश्‍वविजेते केलेच. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफमधील सहकाऱ्यांना समान न्याय मिळण्यासाठी व्यक्त केलेली भावना पैशांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले.

१९ वर्षांखालील विश्‍वविजेतेपद जिंकल्यानंतर बीसीसीआयने खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी बक्षीस जाहीर केले. त्यानुसार द्रविड यांना ५० लाख, तर इतर सपोर्ट स्टाफना प्रत्येकी २५ लाख रुपये मिळणार होते; पण संघाचे यश हे केवळ आपले नसून त्यामध्ये सपोर्ट स्टाफमधील सर्वांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना समान निधी मिळावा, अशी जाहीर मागणी द्रविडने बीसीसीआयकडे केली होती.

बीसीसीसीआयने द्रविडच्या या भावनांचा आदर राखत सर्वांना २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यामुळे द्रविड यांना मिळणारी रक्कम अर्ध्याने कमी झाली; परंतु द्रविड यांना सहकाऱ्यांना समान न्याय मिळाल्याचा आनंद अधिक झाला. 

या अगोदर सपोर्ट स्टाफला २० लाख रुपये बीसीसीआयने जाहीर केले होते. द्रविडची मागणी मान्य झाल्यामुळे वर्षभरात ज्युनियर संघाबरोबर सपोर्ट स्टाफमध्ये काम करणाऱ्या सर्वांना याचा फायदा होणार आहे. काही महिन्यांपूर्वी संघाबरोबर असताना निधन झालेले राजेश सावंत यांच्या कुटुबीयांनाही २५ लाख मिळणार आहेत. सपोर्ट स्टाफमधील विद्यमान प्रशिक्षक पारस म्हांबरे (गोलंदाजी), अभय शर्मा (क्षेत्ररक्षण), योगेश परमार (फिजिओथेरपिस्ट), आनंद दाते (ट्रेनर), मंगेश गायकवाड (मसाजर), देवराज राऊत (व्हिडिओ ॲनालिस्ट); तसेच इंग्लंड दौऱ्यासाठी असलेले प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन, मनुज शर्मा, सुमील मल्हापूरकर आणि अमोघ पंडित यांनाही प्रत्येकी २५ लाखांचा निधी मिळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news rahul dravid support staff