मुंबईच्या मोहिमेची पराभवाने अखेर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 December 2017

नागपूर - मुंबईची रणजी करंडक मोसमातील अडखळत्या मोहिमेची कर्नाटकविरुद्ध डावाने पराभव होत अखेर झाली. जेमतेमच बाद फेरी गाठलेल्या मुंबईला मोसमात क्वचितच सफाईदार कामगिरी करता आली. मुंबईला या उपांत्यपूर्व लढतीत १ डाव २० धावांनी पराभव पत्करावा लागला. 

ताकदवान कर्नाटकविरुद्ध पहिल्या दिवशी निम्मा संघ झटपट परतला, त्याच वेळी मुंबईची हार निश्‍चित झाली होती. मुंबई क्रिकेटचा खडूसपणा दिसत नसल्याने प्रतिकाराची फार आशा नव्हती. पहिल्या डावात ३९७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या मुंबईचा दुसरा डाव ३७७ धावांत आटोपला. ऑफस्पिनर के गौतम याने सहा विकेट घेत मुंबईच्या प्रतिकाराच्या धूसर आशाही संपवल्या. 

चौथ्या दिवसाचे चित्र फार वेगळे नव्हते. सूर्यकुमार यादव आणि आकाश पारकरने २५ षटके किल्ला लढवला खरा; पण बारावे प्रथम श्रेणी शतक झाल्यावर काही वेळातच सूर्यकुमार धावचीत झाला. पारकर आणि सिद्धेश लाडने ५२ धावा जोडल्या; पण विनय कुमारने ही जोडी फोडली आणि कर्णधार आदित्य तरे भोपळाही फोडू शकला नाही. पहिल्या डावातील अर्धशतकवीर धवल कुलकर्णीची सुरवातीपासून हल्ला करण्याची योजना विफल ठरली. शिवम दुबेच्या आक्रमक अर्धशतकाने मुंबईच्या पराभवाचे अंतर कमी झाले. पाचव्या षटकाराच्या प्रयत्नात दुबे बाद झाला आणि मुंबईला एक डाव आणि २० धावांनी पराभव झाला. 

संक्षिप्त धावफलक - मुंबई, पहिला डाव - १७३ आणि दुसरा डाव - ३७७ (सूर्यकुमार यादव १०८ - १८० चेंडूत १६ चौकार व १ षटकार, आकाश पारकर ६५ - १८६ चेंडूत ११ चौकार, सिद्धेश लाड ३१ - ५० चेंडूत ३ चौकार,  शिवम दुबे ७१ - ९१ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकार, धवल कुलकर्णी १५, विनय कुमार १९-६-४४-२, के गोथम ३५.५-८-१०४-६) पराभूत वि. कर्नाटक, पहिला डाव ः ५७७.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ranaji karandak competition