विनयकुमारचे मुंबईला हादरे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 December 2017

मुंबई - हॅटट्रिकवीर विनयकुमारने मुंबईला रणजी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीच्या पहिल्याच दिवशी बॅकफूटवर जाण्यास भाग पाडले. नागपूरच्या वाढत्या थंडीत मुंबईची फलंदाजी गारठली आणि पहिल्या दिवशीच कर्नाटकने पहिल्या डावातील मोठ्या आघाडीची पायाभरणी केली.

विनयने पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पृथ्वी शॉ, तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जय बिस्ता व पुढील चेंडूवर आकाश पारकरला टिपले. त्याने कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रिक पूर्ण केली. 

त्यानंतर त्याने सिद्धेश लाडला टिपले. कर्नाटक म्हणजे विनयच नव्हे हे दाखवताना अरविंदने सूर्यकुमार यादवला आणि मिथुनने आदित्य तरेला टिपले. मुंबईची सुरवात ६ बाद ४९ अशी होती. त्यातच विनयने हेरवाडकरला टिपल्याने मुंबईची अवस्था ८ बाद ९५ झाली आणि काही वेळातच कर्ष कोठारीलाही बाद केले. अखेर धवल कुलकर्णीने मुंबईला दिलासा दिला. त्याला शिवमने चांगली साथ दिली. त्यांनी अखेरच्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या.

संक्षिप्त धावफलक
मुंबई - पहिला डाव - ५६ षटकांत सर्वबाद १७३ (पृथ्वी शॉ २, जय बिस्ता १, अखिल हेरवाडकर ३२ - ७५ चेंडूत ४ चौकार, आकाश पारकर ०, सिद्धेश लाड ८, सूर्यकुमार यादव १४, आदित्य तरे ४, शिवम दुबे ७, धवल कुलकर्णी ७५ - १३२ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार, कर्ष कोठारी १, शिवम मल्होत्रा नाबाद ७ - ४१ चेंडू, विनयकुमार १५-२-३४-६, अभिमन्यू मिथुन ११-१-३१-१, अरविंद श्रीनाथ १५-४-४५-२, कृष्णप्पा गौथम ११-१-३१-१) वि. कर्नाटक, पहिला डाव - २९ षटकांत १ बाद ११५ (रविकुमार समर्थ ४८, मयांक अगरवाल खेळत आहे ६२).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ranaji karandak cricket competition