अखेरच्या रणजी सामन्यात आसामचे महाराष्ट्रावर दडपण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 November 2017

पुणे - आशा संपुष्टात आलेल्या रणजी मोसमातील अखेरच्या सामन्यात आसामविरुद्ध पहिल्याच दिवशी महाराष्ट्रावर दडपण आले आहे. आसामला २७९ धावांत रोखल्यानंतर महाराष्ट्राचीसुद्धा ३ बाद ६४ अशी घसरण झाली. पहिल्या दिवशी १३ विकेट पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रामुख्याने पहिल्या सत्रात महाराष्ट्राला सावध खेळ करावा लागेल. पूना क्‍लबच्या मैदानावर अंकित बावणेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. ३ बाद ७ वरून शिवशंकर रॉय व कर्णधार गोकुल शर्मा यांनी १४९ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राला झुंजविले. मुंढेने रॉय, तर दाढेने गोकुलला पाच धावांच्या अंतराने बाद केले; पण त्यानंतर आसामचे शेपूट वळवळले.

पुणे - आशा संपुष्टात आलेल्या रणजी मोसमातील अखेरच्या सामन्यात आसामविरुद्ध पहिल्याच दिवशी महाराष्ट्रावर दडपण आले आहे. आसामला २७९ धावांत रोखल्यानंतर महाराष्ट्राचीसुद्धा ३ बाद ६४ अशी घसरण झाली. पहिल्या दिवशी १३ विकेट पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रामुख्याने पहिल्या सत्रात महाराष्ट्राला सावध खेळ करावा लागेल. पूना क्‍लबच्या मैदानावर अंकित बावणेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. ३ बाद ७ वरून शिवशंकर रॉय व कर्णधार गोकुल शर्मा यांनी १४९ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राला झुंजविले. मुंढेने रॉय, तर दाढेने गोकुलला पाच धावांच्या अंतराने बाद केले; पण त्यानंतर आसामचे शेपूट वळवळले. आसामच्या फलंदाजांनी अर्धा डझन षटकार खेचले.

संक्षिप्त धावफलक : 
आसाम ः सर्वबाद २७९ (शिवशंकर रॉय ८०-८२ चेंडू, ११ चौकार, १ षटकार, गोकुल शर्मा ८७-१४१ चेंडू, ११ चौकार, १ षटकार, प्रीतम दास ४५-४५ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, अरुप दास ३३-४६ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, निकीत धुमाळ २१-४-९४-५) वि. महाराष्ट्र ः ३ बाद ६४ (ऋतुराज खेळत आहे ४१, चिराग खुराणा ८, नौशाद शेख ०, अंकित बावणे ६, मोटवानी खेळत आहे ७, अरुप दास १-१४, प्रीतम दास २-३२)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ranji trophy maharashtra aasam