एका सामन्याची जडेजावर बंदी

पीटीआय
Monday, 7 August 2017

कोलंबो - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेविरुद्धच्या विजयात मोलाची कामगिरी बजावणारा भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो कॅंडी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यास मुकणार आहे. 

क्रिकेटच्या चालू मोसमात जडेजावर इंदूर येथील कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना खेळपट्टीवर पळून ती खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याला तीन नकारात्मक गुणही देण्यात आले होते. दुसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाने गोलंदाजी करताना निराशेने चेंडू फलंदाज पुष्पकुमाराच्या दिशेने फेकला होता. त्याच्या याच कृतीवर पंच ऑक्‍सेनफोर्ड आणि रॉड टकर यांनी आक्षेप घेतला.

याच कसोटीत सामन्याचा मानकरी ठरणाऱ्या जडेजाला लगेच सामना अधिकाऱ्यांनी बोलावून घेतले. या चौकशीदरम्यान जडेजाने आपली चूक मान्य केली. त्यानंतर सामना अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या नियम २.२८ नुसार आणखी तीन नकारात्मक गुण दिले. एका मोसमात खेळाडूस चारपेक्षा अधिक जास्त नकारात्मक गुण मिळाल्यास त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ravindra jadeja