कसोटीत दहा झेलांचा यष्टिरक्षक साहाचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 January 2018

नवी दिल्ली - गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलचा झेल घेऊन भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने एका कसोटी सामन्यात दहा झेल घेण्याची विक्रमी कामगिरी केली. त्याने महेंद्रसिंह धोनीचा ९ झेलांचा विक्रम मोडला. धोनीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत ही कामगिरी केली होती. साहाने दहाही झेल घेतले, तर धोनीच्या ९ विकेटमध्ये एक फलंदाज यष्टिचीत होता. कसोटी क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

इंग्लंडच्या बॉब टेलरने १९०८ मध्ये मुंबईत भारताविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्टने २०००मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे अशी कामगिरी केली होती. कसोटीत सर्वाधिक ११ झेल घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॅक रसेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलर्सच्या नावावर आहे. 

रसेलने १९९५ मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर डिव्हिलर्सने २०१३ मध्ये जोहान्सबर्ग येथेच पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली आहे. साहाने आतापर्यंत ३२ कसोटी ७५ झेल आणि १० यष्टिचीत असे एकूण ८५ झेल घेतले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Record of wicket keeper Saha in ten catch in test match