खेळाडूंवरचा ताण कमी करा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 September 2017

प्रशिक्षक रवी शास्त्री यांची ‘बीसीसीआय’कडे मागणी

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटूंवरील अतिश्रमाचा बोजा कमी करण्यासाठी भविष्यातील स्पर्धा-मालिकांचा कार्यक्रम निश्‍चित करताना पुरेशी विश्रांती मिळावी, यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयकडे केली आहे.

अनिल कुंबळे यांच्याकडून मुख्य प्रशिक्षकांची सूत्रे घेतल्यानंतर पहिल्याच परीक्षेत १०० टक्के यश मिळवणाऱ्या रवी शास्त्री यांनी क्रिकेट प्रशासक समितीशी व्हिडिओ लिंकवरून संपर्क साधला. दोन मालिकांमध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या कमी विश्रांतीवर शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली. 

असा आहे भरगच्च कार्यक्रम

नुकत्याच संपलेल्या श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ चार दिवसांनंतर आता मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झटपट क्रिकेटची मालिका खेळणार आहे. १७ सप्टेंबर ते १३ ऑक्‍टोबर असा कालावधी आहे. ही मालिका संपतो तोच चार दिवसांनंतर न्यूझीलंडविरुद्धची मालिका होत आहे. ही मालिका ७ नोव्हेंबरपर्यंत चालेल. आठवड्याभरानंतर म्हणजेच १५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी-एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. एवढ्यावर भारतीय संघाचे क्रिकेट थांबणार नाही, तर चार दिवसांनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ रवाना होणार आहे.  तेथे तीन ट्‌वेन्टी-२०, तीन एकदिवसीय सामने आणि चार कसोटी असे सामने होणार आहेत.

इंग्लंड- ऑस्ट्रेलियाला नाताळची सुटी
शास्त्री यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या क्रिकेट कार्यक्रमाबाबतही माहिती दिली. त्यांच्या खेळाडूंना नाताळचा ब्रेक मिळतो. परदेश दौऱ्यावर असले, तर  या सणासाठी घरी परत येतात आणि पुन्हा दौऱ्यावर जातात. भारतीय संघ ऐन दिवाळीतच न्यूझीलंडविरुद्धची मालिका खेळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Reduce the stress of the players