आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्माची पाचव्या स्थानावर झेप

यूएनआय
Tuesday, 19 December 2017

नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील धमाकेदार द्विशतकी खेळीने भारताच्या रोहित शर्माने आयसीसी एकदविसीय क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कारकिर्दीत प्रथमच ८०० गुणांचा टप्पा ओलांडत त्याने दोन क्रमांकाची उडी घेत पाचवा क्रमांक मिळविला. शिखर धवनलाही एका स्थानाचा फायदा झाला असून, तो १४ स्थानावर आला आहे. मालिकेतून माघार घेतल्यानंतरही विराट कोहलीचे अग्रस्थान कायम आहे. एबी डिव्हिलर्स दुसऱ्या, तर डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीत पाकिस्तानचा हसन अली आघाडी असून, इम्रान ताहिर दुसऱ्या आणि भारताचा जसप्रीत बुमरा तिसऱ्या स्थानावर आहेत.

नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील धमाकेदार द्विशतकी खेळीने भारताच्या रोहित शर्माने आयसीसी एकदविसीय क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कारकिर्दीत प्रथमच ८०० गुणांचा टप्पा ओलांडत त्याने दोन क्रमांकाची उडी घेत पाचवा क्रमांक मिळविला. शिखर धवनलाही एका स्थानाचा फायदा झाला असून, तो १४ स्थानावर आला आहे. मालिकेतून माघार घेतल्यानंतरही विराट कोहलीचे अग्रस्थान कायम आहे. एबी डिव्हिलर्स दुसऱ्या, तर डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीत पाकिस्तानचा हसन अली आघाडी असून, इम्रान ताहिर दुसऱ्या आणि भारताचा जसप्रीत बुमरा तिसऱ्या स्थानावर आहेत. फलंदाजीत कोहली आणि रोहित शर्मा वगळता एकही भारतीय फलंदाज पहिल्या दहांत नाही. महेंद्रसिंह धोनी ११व्या स्थानी आहे. गोलंदाजीतही केवळ बुमरा पहिल्या दहांत असून, अक्षर पटेल ११व्या स्थानी आहे. सांघिक क्रमवारीत काहीही फरक पडलेला नाही. दक्षिण आफ्रिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news rohit sharma indian team Icc