रहाणेचा फॉर्म ही चिंतेची बाब नाही - गांगुली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 December 2017

पुणे - भारतीय क्रिकेट संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही या संघाकडून चांगल्याच कामगिरीची अपेक्षा असून, या पार्श्‍वभूमीवर अजिंक्‍य रहाणेच्या अपयशाची चर्चा होत असली तरी, त्याचा खराब फॉर्म ही चिंतेची बाब नसल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने येथे व्यक्त केले.

बंगाल क्रिकेट संघटनेचा सचिव असलेला गांगुली येथे सुरू असलेल्या दिल्ली विरुद्ध बंगाल उपांत्य लढतीसाठी आला होता. त्या वेळी पत्रकारांशी साधलेल्या संवादात त्याने भारतीय संघाबाबत मोकळेपणाने मते मांडली. गांगुली म्हणाला,‘‘रहाणेकडून धावा होत नसल्या तरी त्याच्या फॉर्मबाबत चिंता नसावी. तो गुणी फलंदाज आहे आणि असे गुणी फलंदाज फार काळ खराब फॉर्ममध्ये राहू शकत नाहीत. कर्णधार विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा, रहाणे, मुरली विजय सगळेच चांगले फलंदाज आहेत आणि दक्षिण आफ्रिकेत ते सर्वोत्तमच ठरतील.’’

  • पहिल्या कसोटीसाठी केपटाऊनमधील परिस्थिती लक्षात घेतल्यास हार्दिक पंड्याचा विचार व्हावा उसळी असणाऱ्या खेळपट्ट्यांवर संधी दिल्याशिवाय पंड्याची निवड योग्य आहे की नाही हे कळणार नाही
  • खेळपट्टी फ्लॅट असेल, तर जास्तीचा फलंदाज खेळवावा, खेळपट्टीवर गवत असेल, तर निश्‍चित जास्तीचा गोलंदाज खेळवावा
  • आव्हान सोपे नाही, तसेच कठीणही नाही. खेळाडूंमध्ये योग्य समन्वय हवा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news saurav ganguly cricket ajinkya rahane