जडेजाचे एका षटकात सहा षटकार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 December 2017

राजकोट - रवींद्र जडेजाने आंतरजिल्हा टी-२० क्रिकेट स्पर्धेत एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला. जामनगरतर्फे तो खेळला. अमरेलीच्या नीलम वाम्‌जा याने टाकलेल्या दहाव्या षटकात त्याने ही कामगिरी केली. त्याने ६९ चेंडूंमध्ये १० षटकार व १५ चौकारांसह १५४ धावा फटकावल्या. जामगरने २० षटकांत ६ बाद २३९ धावा केल्या. अमरेलीला ५ बाद ११८ इतकीच मजल मारता आली. भारताकडून यापूर्वी रवी शास्त्री आणि युवराजसिंग यांनी एका षटकात सहा षटकार ठोकले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news six sixer in one over by ravindra jadeja