वाढत्या अपेक्षांचे दडपण पेलवले नाही - मानधना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 August 2017

पुणे - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दोन्ही सामन्यांत चांगली कामगिरी झाली होती. खरे, तर त्यामुळे आत्मवश्‍विास उंचावणे अपेक्षित होते. मात्र, वाढलेल्या अपेक्षांच्या दडपणाचा सामना करण्यात अपयशी ठरल्यानेच माझ्या कामगिरीवर परिणाम झाला, असे भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने सांगितले.

पुणे - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दोन्ही सामन्यांत चांगली कामगिरी झाली होती. खरे, तर त्यामुळे आत्मवश्‍विास उंचावणे अपेक्षित होते. मात्र, वाढलेल्या अपेक्षांच्या दडपणाचा सामना करण्यात अपयशी ठरल्यानेच माझ्या कामगिरीवर परिणाम झाला, असे भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी स्मृती मानधनाचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेपूर्वी झालेल्या दुखापतीनंतरही विश्‍वकरंडक खेळण्याच्या इराद्यामुळे झपाटून गेले होते असे सांगून स्मृती म्हणाली, ‘‘दुखापतीमुळे मैदानापासून दूर होते. सरावदेखील मनासारखा झाला नव्हता. अशा वेळी राष्ट्रीय संघात पुनरागमन करणे कठिण असते.

पण, मेहनतीला पर्याय नसतो. कठोर मेहनत घेतली. निवड समितीनेदेखील माझ्यावर विश्‍वास दाखवला. सराव सामन्यात अपयशी ठरत होते. फलंदाजी विसरल्यासारखे एकवेळ वाटले. अशा वेळी सहकाऱ्यांनी धीर दिला. त्यामुळे मुख्य स्पर्धेत उभी राहू शकले.  सुरवात चांगली झाली. यशाबरोबर अपेक्षाही वाढतात आणि याच वाढत्या अपेक्षांचा सामना करण्यात मी कमी पडले.’’

विश्‍वकरंडक स्पर्धेमुळे केवळ माझ्याच नाही, तर महिला क्रिकेटचाच चेहरा मोहरा बदलल्याचे तिने मान्य केले. या विश्‍वकरंडक स्पर्धेने महिला क्रिकेटला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले असे सांगून स्मृती म्हणाली, ‘‘या स्पर्धेमुळे माझे आयुष्यच बदलले. मला वेगळीच ओळख मिळाली. पण, हे केवळ माझ्यापुरते मर्यादित नाही, तर प्रत्येक खेळाडूची हीच धारणा आहे. या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणामुळे महिला क्रिकेट घराघरांत पोचले. महिला क्रिकेटपटूंची जिगर अनुभवता आली. त्यांचे सामनेही चुरशीचे होतात हे समजले. त्यामुळे महिला क्रिकेटलाही दर्शक लाभले. एकूणच महिला क्रिकेटचाच चेहरा मोहरा या स्पर्धेमुळे बदलला.’’

स्मृतीने विश्‍वकरंडकाच्या आठवणी सांगताना हरमनच्या खेळीचे कौतुक केले. महिला क्रिकेटमधील अशी झंझावती खेळी आपण पहिल्यांदाच पाहिली. जबरदस्त खेळी ती खेळली. दुर्दैवाने आमचा अनुभव अंतिम फेरीत कमी पडला, असे स्मृतीने मान्य केले.

काय म्हणाली स्मृती
संघातील प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले. प्रयत्न नव्हे, तर अनुभव कमी पडला
पुरुष आणि महिला क्रिकेट यांची तुलना अयोग्य
महिलांची आयपीएल झाल्यास आवडेल
प्रत्येक खेळाडूने तंदुरुस्तीवर भर द्यावा
माझा भाऊच माझा आदर्श


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news smruti mandhana talking