आफ्रिका दौऱ्यासाठी सतरा जणांत बुमरा, पार्थिव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 December 2017

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेकरिता निवड समितीने संघाची घोषणा दिल्लीमधे करताना जसप्रीत बुमरा आणि पार्थिव पटेलला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संघ ३ कसोटी, ५ एक दिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळेल. 

२०१८ मध्ये संघाला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात आपली क्षमता सिद्ध करायचे आव्हान असणार आहे. त्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. दौऱ्यावर नेहमी १६ जणांचा संघ निवडला जातो. परंतु दौऱ्याचे महत्त्व आणि तिथल्या खेळपट्ट्यांचा स्वभाव लक्षात घेता निवड समितीने एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून बुमराला संघात घेऊन जाण्याचा निर्णय कोहलीबरोबर चर्चा करून घेतला आहे. 

कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, के. एल. राहुल, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, वृद्धिमान साहा, पार्थिव पटेल, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा. टी-२० संघ ः रोहित (कर्णधार), राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, धोनी, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, बुमरा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुडा, महंमद सिराज, बसील थम्पी, जयदेव उनडकट.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news south africa with india test cricket competition