ये रे ये रे पावसा...!

सुनंदन लेले
Monday, 8 January 2018

केप टाउन - दुष्काळाने बेजार असलेले क्रिकेट चाहते दक्षिण आफ्रिकेच्या भारतावरील निर्विवाद वर्चस्वाची आशा बाळगून न्यूलॅंड्‌स मैदानाकडे सकाळपासूनच गर्दी करत होते. सामना सुरू होण्यापूर्वी दीड तास आलेले चाहते उत्साहात होते; पण पावसाने तिसऱ्या दिवशी अविरत खेळी करत हुकूमत राखली. क्रिकेटचा आनंद हिरावल्यापेक्षा पाऊस आल्याचाच आनंद चाहत्यांना जास्त होता. 

लहानग्यांच्या या उत्साहावर केप टाउनच्या लहरी हवामानाने पाणी ओतले. केप टाउनवासीयांबरोबर भारतीय संघही एक प्रकारे सुखावला होता. बॅकफूटवर गेलेल्या भारतीय संघाला सामना वाचवायचा दृष्टीने वाया गेलेला एक दिवस मोलाचा ठरणार आहे. त्यातच उद्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रातही पावसाची खेळी अपेक्षित आहे. 

तिसऱ्या दिवशी पाऊस पडणार हा दक्षिण आफ्रिका हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. सकाळपासून सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत थांबलाच नव्हता. उपाहारानंतर पावसाने काहीसा ब्रेक घेतला. ग्राउंड्‌समननी काम सुरू केले. सुपरसॉपर मैदानात आले; पण कव्हर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच पुन्हा पाऊस आला आणि अखेर दिवसाचा खेळ रद्द झाला. चौथ्या आणि पाचव्या दिवशी ९८ षटकांचा खेळ करण्याचे ठरले; पण सोमवारी ठरलेल्या वेळेनुसारच खळ होईल. दक्षिण आफ्रिकेकडे एकंदरीत १४२ धावांची आघाडी आहे आणि त्यांच्या आठ विकेट्‌स शिल्लक आहेत. भारतीय संघाने एकंदरीत चित्र पाहून इनडोअर सरावास पसंती दिली. 

पावसाने येथील लोकांच्या तोंडचे पाणी दोन वर्षांपासून पळवले आहे. केपटाउनला अनेक जिवंत पाण्याचे झरे आहेत. तेथून पाणी नेण्यासाठी उंची मोटार कारमधून लोक येतात आणि आपल्या बाटल्या, कॅन्समध्ये पाणी भरून घरी नेतात. अर्थातच अनेक जण पाऊस ओढ देत असल्यामुळे त्रासले होते. आता त्यांची चिडचीड नक्कीच कमी होईल. पावसामुळे एका दिवसाचा खेळ झाला नाही तरी काही फरक पडत नाही. खेळापेक्षा जीवन महत्त्वाचे आहे, आम्ही चाहत्यांचा उत्साह जाणतो, असे भारतीय संघातील काही खेळाडूंनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news south africa india test cricket match rain