दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारत तीन कसोटी खेळणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 September 2017

जोहान्सबर्ग - भारतीय क्रिकेट संघ या मोसमात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही क्रिकेट मंडळांनी आज संयुक्त पत्रक काढून याची घोषणा केली. पहिला कसोटी सामना ५ जानेवारी २०१८ पासून केपटाऊन येथे सुरू होईल. त्यानंतर उर्वरित दोन कसोटी, सहा एकदिवसीय सामने आणि तीन टी २० सामने खेळविले जातील. या कार्यक्रमाची घोषणा करतानाच दक्षिण आफ्रिकेने चार दिवसाचा एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असल्याचे देखील जाहीर केले. अर्थात, हा सामना २६ ते २९ डिसेंबर रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे झिंबाब्वेविरुद्ध खेळविला जाईल.

जोहान्सबर्ग - भारतीय क्रिकेट संघ या मोसमात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही क्रिकेट मंडळांनी आज संयुक्त पत्रक काढून याची घोषणा केली. पहिला कसोटी सामना ५ जानेवारी २०१८ पासून केपटाऊन येथे सुरू होईल. त्यानंतर उर्वरित दोन कसोटी, सहा एकदिवसीय सामने आणि तीन टी २० सामने खेळविले जातील. या कार्यक्रमाची घोषणा करतानाच दक्षिण आफ्रिकेने चार दिवसाचा एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असल्याचे देखील जाहीर केले. अर्थात, हा सामना २६ ते २९ डिसेंबर रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे झिंबाब्वेविरुद्ध खेळविला जाईल. भारताने कसोटी सामन्यांची संख्या तीन करून एकदिवसीय सामने वाढविण्याची विनंती केली होती. ती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मान्य केली. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दौऱ्यात चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळविण्यात येणार होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news south africa with india three test cricket match