esakal | द. आफ्रिकेचा दणदणीत विजय
sakal

बोलून बातमी शोधा

द. आफ्रिकेचा दणदणीत विजय

द. आफ्रिकेचा दणदणीत विजय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ब्लोएमफाँतेन (दक्षिण आफ्रिका) - वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्याच दिवशी बांगलादेशावर १ डाव आणि २५४ धावांनी दणदणीत विजय मिळविला. 

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी विजयाच्या इतिहासात हा सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी केपटाऊन येथे २०००-०१ मध्ये श्रीलंकेवर १ डाव २२९ धावांनी विजय मिळविला होता. 

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ५७३ धावांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशाचा पहिला डाव १४७ धावांत आटोपला होता. फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर त्यांचा दुसरा डाव १७२ धावांत संपुष्टात आला. रबाडाने ३० धावांत ५ गडी बाद केले. रबाडाने सामन्यात ६३ धावांत १० गडी बाद केले. त्याने बाविसाव्या कसोटीतच कारकिर्दीत शंभर गडी बाद करण्याची कामगिरी केली. यंदाच्या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक ५४ गडी बाद केले आहेत. 

संक्षिप्त धावफलक 
दक्षिण आफ्रिका ४ बाद ५७३ घोषित वि.वि. बांगलादेश १४७ आणि १७२ (महमुदुल्ला ४३, इम्रूल कायेस ३२, कागिसो रबाडा ५-३०, फेहलुकवायो 
३-३६)

loading image