द. आफ्रिकेचा दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर चौथ्या दिवशीच ३४० धावांनी मात

नॉटिंगहॅम (लंडन) - पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर जबरदस्त मुसंडी मारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने सोमवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा ३४० धावांनी पराभव केला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली.

विजयासाठी ४७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव चौथ्या दिवशी उपाहारापूर्वीच १३३ धावांत कोलमडला. 

इंग्लंडने चौथ्या दिवशी बिनबाद १ वरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर त्यांना दिवसाच्या दुसऱ्याच षटकांत धक्का बसला. फिलॅंडरने जेनिंग्जचा त्रिफळा उडवला. त्यानंतर गॅरी बॅलन्स आणि कर्णधार ज्यो रूट स्वस्तात बाद झाल्याने इंग्लंडचा डाव अडचणीत आला. संथ खेळणारा ॲलिस्टर कूक आणि जॉनी बेअरस्टॉही बाद झाल्यामुळे ८४ धावांतच त्यांचा निम्मा संघ गारद झाला. 

फलंदाजी आणि गोलंदाजीतही चमक दाखवणाऱ्या व्हर्नान फिलॅंडरसमोर इंग्लंडचे फलंदाज शरण आले. केशव महाराजची फिरकीही त्यांच्या फलंदाजांना कळाली नाही. अष्टपैलू बेन स्टोक्‍स आणि मोईन अली यांच्याकडून इंग्लंडला अपेक्षा होत्या. मात्र, मोठ्या आव्हानाच्या दडपणासमोर त्यांनाही फार काळ तग धरता आला नाही. त्यांच्या अखेरच्या आठ फलंदाजांपैकी सहा फलंदाज १३ धावांत बाद झाले. फिलॅंडर आणि महाराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्यांना ख्रिस मॉरिस आणि डुआने ऑलिव्हिएर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून सुरेख साथ केली. कागिसो रबाडावरील बंदीमुळे संधी मिळालेल्या ऑलिव्हिएरने लागोपाठच्या दोन चेंडूवर मार्क वूड आणि जेम्स अँडरसनला बाद करून हॅटट्रिकची संधी निर्माण केली. मात्र, रबाडावरील बंदी एकाच सामन्याची असल्यामुळे ऑलिव्हिएरला पुढच्या सामन्यात संधी मिळणार की नाही, हा प्रश्‍नच आहे.

संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका ३३५ आणि ९ बाद ३४३ घोषित वि.वि. इंग्लंड २०५ आणि १३३ (ॲलिस्टर कूक ४२, मोईन अली २७, व्हर्नान फिलॅंडर ३-२४, केशव महाराज ३-४२, ख्रिस मॉरिस २-७, ऑलिव्हिएर २-२५).

विजय दक्षिण आफ्रिकेचा
इंग्लंडचे दोन्ही डाव एकूण ९६.१ षटकांतच आटोपले. इंग्लंडवर अशी नामुष्की येण्याची सातवी वेळ
दक्षिण आफ्रिकेचा कसोटीत सर्वाधिक धावांनी चौथा विजय. मोठा विजय इंग्लंडविरुद्ध ३५६ धावांनी १९९४ मध्ये.
ट्रेंट बिजवर सलग सात सामन्यांत अपराजित राहण्याची इंग्लंडची मालिका खंडित

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ssouth africa win in cricket test match