‘स्टार इंडिया’ने भरले ८२ कोटी मुद्रांक शुल्क

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 September 2017

मुंबई - प्रतिस्पर्धी सोनी कंपनीवर मात करून ‘स्टार इंडिया’ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून प्रसारमाध्यमांचे अधिकार कोट्यवधी रुपयांना मिळविले असले, तरी त्यांना त्या बदल्यात महाराष्ट्र सरकारला ८२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) भरावे लागले आहे. 

अलीकडेच ‘स्टार इंडिया’ने ‘बीसीसीआय’कडून प्रसारमाध्यमांचे अधिकार १६ हजार कोटी रुपयांना खरेदी केले होते. ‘स्टार’ या घसघशीत व्यवहाराची दखल महाराष्ट्राच्या मुद्रांक आणि नोंदणी विभागाने तातडीने घेतली. विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना नियमानुसार स्टॅम्प ड्यूटी भरण्यास सांगितले.

मुद्रांक कार्यालयातून ‘स्टार इंडिया’ला मुद्रांक भरून तयार करण्यात आलेले करारपत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ‘बीसीसीआय’शी झालेल्या कराराच्या एकूण रकमेच्या ०.५ टक्के मुद्रांक ‘स्टार’ इंडियाला भरावे लागले. त्यानुसार त्यांनी ८१ कोटी ७३ लाख ७५ हजार ५०० रुपये इतके शुल्क भरल्याचे मुद्रांक विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ‘ओप्पो’कडूनदेखील ५.३९ कोटी रुपयांचे शुल्क वसूल करण्यात आले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news star india give 82 crore stamp fee