स्टार-सोनी-जिओमध्ये तीव्र स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 April 2018

बीसीसीआयच्या टीव्ही-डिजिटल ई हक्कांसाठी आज ४,४४२ कोटींपुढे लिलाव
मुंबई - क्रिकेटविश्‍वात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या बीसीसीआयच्या देशातील आंतरराष्ट्रीय सामने आणि देशांतर्गत सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळवण्याची स्पर्धा क्रिकेटच्या रंगलेल्या सामन्याएवढीच चुरशीची होत आहे. स्टार इंडिया, सोनी नेटवर्क आणि जिओ (रिलायन्स) यांच्यात काँटे की टक्कर सुरू असून, आजच्या पहिल्या दिवशी निकाल न लागल्यामुळे आता उद्या (ता. ४) पुढचा अंक सुरू होणार आहे. 

प्रशासकीय समितीने प्रथमच ई-लिलाव पद्धतीचा अवलंब केल्यामुळे स्पर्धा वाढली आहे. कोणी किती रकमेची बोली लावली, हे गुलदस्तात राहत आहे. आज तिघा स्पर्धकांची एकत्रितपणे (टीव्ही-डिजिटल) ४,४४२ कोटींची बोली लावल्यामुळे ही कोंडी फुटली नाही. जोपर्यंत तिघांपैकी दोघे जण थांबत नाहीत, तोपर्यंत बोलीचा हा अंक असाच पुढे जात राहणार आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही हा ‘सामना’ रंगण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

आज सकाळी ११ वाजता ई-लिलावाच्या प्रक्रियेस सुरवात झाली. तेव्हा स्टार, सोनी आणि जिओ पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले; मात्र डिजिटल हक्कांसाठी प्रयत्नशील असलेले फेसबुक आणि गुगल स्पर्धेतून मागे पडले.

पुढील पाच वर्षांसाठीच्या भारतातील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रसारणाचे या हक्कांचे वितरण होणार आहे. या कालावधीत भारतात २२ कसोटी, ४२ एकदिवसीय सामने आणि ३८ ट्‌वेंटी-२० सामने होणार आहेत. पहिल्या वर्षासाठी (२०१८-१९) एका सामन्याकरिता एकत्रित पायाभूत किंमत ४३ कोटींची, तर २०१९ ते २०२३ पर्यंतच्या चार वर्षांसाठी ४० कोटींची ठेवण्यात आली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news star sony gio competition