स्टीव स्मिथचे द्विशतक

वृत्तसंस्था
Sunday, 17 December 2017

पर्थ - तिसऱ्या ॲशेस कसोटीत पुनरागमन करून मालिकेतील आव्हान जिवंत राखण्याच्या इंग्लंडच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. तिसऱ्या दिवशी त्यांना ऑस्ट्रेलियाची अवघी एकच विकेट मिळाली. प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव स्मिथमुळे त्यांची डोकेदुखी कायम राहिली. द्विशतक काढून नाबाद राहिलेल्या स्मिथला मिचेल मार्श १८१ धावा काढून साथ देत आहे.

दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद ५४९ धावा केल्या. कांगारू १४६ धावांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या पाच विकेट बाकी आहेत. ऑस्ट्रेलियाने दिवसभरात ९० षटकांत ३४६ धावा फटकावल्या.

 इंग्लंडला केवळ एकच विकेट मिळाली. मोईन अलीने शॉन मार्शला बाद केले. स्मिथ काल शतकापासून आठ धावा दूर होता. त्याने द्विशतकी टप्पा पार केला. 

मिचेल मार्शने २१ कसोटी व ३५ डावांनंतर अखेर शतकाची प्रतीक्षा संपुष्टात आणली.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड - 
पहिला डाव - ४०३

ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - १५२ षटकांत ४ बाद ५४९ (स्टीव स्मिथ खेळत आहे २२९-३९० मिनिटे, २८ चौकार, १ षटकार, शॉन मार्श २८, मिचेल मार्श खेळत आहे १८१-२३४ चेंडू, २९ चौकार, जेम्स अँडरसन ०-८५, स्टुअर्ट ब्रॉड ०-११२, क्रेग ओव्हर्टन २-२०२, मोईन अली १-१०४)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Steve Smith Twenty20 double century cricket