स्टीव्हन फिन ॲशेसला मुकणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 November 2017

सिडनी - ॲशेस दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाला मंगळवारी दुसरा धक्का बसला. स्टीव्हन फिन गुडघ्याच्या दुखापतीमुळे ॲशेस मालिकेत खेळू शकणार नसल्याचे इंग्लंड क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले. आधीच बेन स्टोक्‍सला बेशिस्त वर्तनामुळे वगळण्यात आल्यामुळे इंग्लंडला पहिला धक्का बसला होता. त्याच्या जागी फिनची निवड करण्यात आली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे फिन सराव सामन्यात खेळू शकला नाही. आता तो दोन दिवसात उपचारासाठी इंग्लंडला परतणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news steven finn injured