सपोर्ट स्टाफ निवडीचे अधिकार मुख्य प्रशिक्षकांना - लिमये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

मुंबई - भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक निवडीचे अधिकार सल्लागार समिती (सचिन-गांगुली-लक्ष्मण) यांना देण्यात आले होते; तर सपोर्ट स्टाफ निवडीचे अधिकार मुख्य प्रशिक्षकांना आहेत. सपोर्ट स्टाफबाबत सल्लागार समिती केवळ शिफारस करू शकते, असे मत प्रशासकीय समितीचे माजी सदस्य विक्रम लिमये यांनी मांडले.

एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत देताना त्यांनी मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या निवडीवरून सुरू असलेल्या वादाबाबत मतप्रदर्शन केले. खरे तर कुंबळे-कोहली हा वाद व्यवस्थितपणे हाताळायला हवा होता. ज्यांना या दोघांमध्ये विसंवाद आहे हे लक्षात आले होते, त्यांनी त्या वेळी तोडगा काढायला हवा होता, असे लिमये म्हणाले. सल्लागार समिती मुख्य प्रशिक्षकांची निवड केल्यानंतर सपोर्ट स्टाफबाबत केवळ शिफारस करू शकते आणि आपल्याला कायमस्वरूपी इतर प्रशिक्षक हवे आहेत का ठराविक दौऱ्यांसाठी सल्लागारांची गरज आहे, हा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्य प्रशिक्षकांना देण्यात आल्याचे लिमये यांनी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news support staff selection rites to main trainer