महाराष्ट्राला मुंबईवर विजय अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

राजकोट - पश्‍चिम विभागीय टी- २० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राची गुरुवारी कट्टर प्रतिस्पर्धी मुंबईविरुद्ध लढत होत आहे. 

महाराष्ट्राला आगेकूच करण्यासाठी महाराष्ट्राला विजय अनिवार्य आहे. बडोदा आणि सौराष्ट्राने सलग दोन सामने जिंकले आहेत. यात सरस नेट रनरेटमुळे बडोदा आघाडीवर आहे. बडोद्याचा नेट रनरेट १.२२५, तर सौराष्ट्राचा ०.६६६ इतका आहे. 

महाराष्ट्राने दोन सामन्यांत एक विजय- एक पराभव अशा कामगिरीसह चार गुण मिळविले आहेत. महाराष्ट्राचा नेट रनरेट ०.०९३ इतका आहे. मुंबईचा एकच सामना शिल्लक असून, दोन पराभवांशिवाय उणे नेट रनरेटमुळे त्यांच्या आशा केवळ कागदावर आहेत.

 महाराष्ट्र तिसरा, तर मुंबई चौथा व गुजरात शेवटचा पाचवा आहे. स्पर्धेच्या स्वरूपानुसार पाच गटांमधील पहिले दोन असे एकूण दहा संघ अव्वल साखळीत प्रवेश करतील. त्यानंतर दोन गटांत त्यांची विभागणी होईल. त्यात अव्वल साखळी सामने होतील. पहिले दोन संघ थेट अंतिम फेरीत जातील.

त्रिपाठी, बावणेवर मदार - भावे
महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले, की आतापर्यंत दोन्ही सामन्यांत गोलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता फलंदाजांवर मदार आहे. कर्णधार राहुल त्रिपाठी आणि अंकित बावणे यांनी फॉर्म दाखविण्याची गरज आहे.

Web Title: sports news t-20 cricket competition