esakal | मुन्‍रोचे विक्रमी शतक; न्यूझीलंडचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

मुन्‍रोचे विक्रमी शतक; न्यूझीलंडचा विजय

मुन्‍रोचे विक्रमी शतक; न्यूझीलंडचा विजय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माउंट मौनगनुई (न्यूझीलंड) - कॉलिन मुन्‍रोच्या विक्रमी शतकी खेळीने न्यूझीलंडने बुधवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टी- २० सामन्यात विंडीजचा ११९ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने मालिका २-० अशी जिंकली. दुसरा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. 

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २४३ धावा केल्या. यामध्ये मुन्‍रोची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. त्याने ५३ चेंडूंत १०४ धावा केल्या. टी- २० क्रिकेटमध्ये तीन शतके झळकाविणारा मुन्‍रो पहिलाच फलंदाज ठरला. वेस्ट इंडीजचा डाव १६.३ षटकांत ९ बाद १२४ असा मर्यादित राहिला. 

loading image