अजिंक्‍यमुळे संघ समतोल - कोहली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिनाद - अजिंक्‍य रहाणेमुळे संघात समतोलपणा आला. त्यामुळे आम्ही एक जास्त गोलंदाज खेळवू शकलो. २०१९ मधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी ही रचना आम्हाला मोलाची ठरणार असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा १०५ धावांनी पराभव केला.

या सामन्यात सलामीला खेळणाऱ्या रहाणेने १०४ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने ४३ षटकांत ५ बाद ३१० धावा केल्या. त्यानंतर विंडीजला २०५ धावांत रोखले. चायनामन कुलदीप यादवने ३ बळी मिळवून ठसा उमटवला.

अजिंक्‍य हा संघातील रचनेचा अविभाज्य घटक आहे. सलामीसाठी पर्याय म्हणून तो नेहमीच संघात असतो. मधल्या फळीतही तो आधार ठरतो. त्यामुळे तो विश्‍वकरंडकसारख्या स्पर्धांमध्ये आमचा महत्त्वाचा खेळाडू आहे, असे विराटने सांगितले.

संक्षिप्त धावफलक 
भारत - ४३ षटकांत ५ बाद ३१० (अजिंक्‍य रहाणे १०३,  शिखर धवन ६३, विराट कोहली ८७, अलझारी जोसेफ २-७३). वि. वि. वेस्ट इंडीज - ६ बाद २०५ (शई होप्स ८१, रोस्टन चेस नाबाद ३३, भुवनेश्‍वर २-९, कुलदीप ३-५०)

भारताचा तीनशे धावांचा विश्‍वविक्रम
विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९६व्यांदा तीनशे धावांची मजल ओलांडली. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने अशी कामगिरी ९५ वेळा केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनशेपेक्षा अधिक धावा नव्वदहून अधिक वेळा करणाऱ्यांत केवळ भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोनच संघ आहेत. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण आफ्रिकेने ७७ वेळा तीनशेची मजल मारली आहे. 

Web Title: sports news Team balance due to ajinkya rahane