स्विंग नाही; पण बाऊन्स मिळणार

सुनंदन लेले
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सेंच्युरियन - पहिली कसोटी गमाविल्यानंतर भारतीय संघात निराशेचे वातावरण होते. दुसऱ्या कसोटीसाठी सेंच्युरियनची खेळपट्टी अधिक वेगवान आणि बाऊन्सी असण्याचे संकेत मिळत आहेत. यजमान संघाच्या वेगवान माऱ्याला तोंड देण्यासाठी फलंदाजीची फळी भक्कम असणे आवश्‍यक असून, त्या दृष्टीने दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात फलंदाजीच्या आघाडीवर एखादा बदल होऊ शकतो, अशीच येथे चर्चा आहे. 

भारतीय खेळाडूंनी तीन तास सराव केला. त्याचबरोबर आळीपाळीने सगळे भारतीय फलंदाज विकेटवर जाऊन खेळपट्टीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते. खेळपट्टी बनवणाऱ्या ग्राउंड्‌समनची भेट घेतल्यावर त्याने खेळपट्टीवर केप टाउनपेक्षा अधिक बाऊन्स असेल, असे सांगितले. बुमराने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘कसोटी संघात जागा मिळवणे माझ्यासाठी अभिमानाचे होते. दक्षिण आफ्रिकेतील विकेट्‌सवर गोलंदाजी करताना काय काळजी घ्यायची त्याचा मी अभ्यास करत होतो. विकेट कसे आहे...समोरच्या संघात कोण आहे...याचा अतिरेकी विचार करून मनात गोंधळ निर्माण करणे मला आवडत नाही. त्यापेक्षा माझ्या बलस्थानांचा विचार करून गोलंदाजी करणे मी पसंत करतो.’’

Web Title: sports news test cricket match