रहाणेला खेळविण्याचे संकेत

सुनंदन लेले
Monday, 22 January 2018

जोहान्सबर्ग - दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर अजिंक्‍य रहाणेला आता अखेर तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळविण्याचे स्पष्ट संकेत रविवारी झालेल्या सराव सत्रादरम्यान मिळाले. रोहित शर्माच्या जागीच त्याची निवड केली जाईल. 

जोहान्सबर्ग - दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर अजिंक्‍य रहाणेला आता अखेर तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळविण्याचे स्पष्ट संकेत रविवारी झालेल्या सराव सत्रादरम्यान मिळाले. रोहित शर्माच्या जागीच त्याची निवड केली जाईल. 

दुसऱ्या कसोटीनंतर चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघाने सराव आणि जोहान्सबर्ग कसोटी सामान्यांच्या तयारीला सुरवात केली. वाँडरर्स क्रिकेट मैदानाच्या बाहेरील बाजूस असलेल्या सर्व सुविधेचा फायदा घेत संपूर्ण संघाने साडेतीन तास सर्व केला. लोकेश राहुल, मुरली विजय या सलामीच्या जोडीसह चेतेश्‍वर पुजारा यांनी सर्वप्रथम नेटमध्ये सराव केला. त्यानंतर क्रमाने कोहली, हार्दिक पंड्या, अजिंक्‍य रहाणे यांनी सराव केला. त्या वेळी रोहित शर्मा मुख्य मैदानात कॅच प्रॅक्‍टिस करताना दिसत होता. रहाणेच्या समावेशाविषयी कुणी स्पष्ट बोलत नसले, तरी त्याचा सरावातील खुला सहभाग त्याच्या समावेशाचे संकेत देणाराच होता. 

दक्षिण आफ्रिकेने सरावासाठी गोलंदाज पुरविण्यास नकार दिल्यावर भारतातून बोलाविण्यात आलेल्या नवदीप सैनीने सर्व फलंदाजांना सराव देताना आपल्या स्विंग आणि वेगाने उपस्थितांना प्रभावित केले. रहाणे आणि कोहली यांनी फलंदाज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘थ्रो-डाऊन्स’चाही सराव केला. सर्व गोलंदाज आणि प्रमुख फलंदाजांनी कसून सराव केला.

सरावानंतर प्रशिक्षक शास्त्री यांनी खेळाडूंनी संधी साधली नाही याबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘आपल्याला दोन्ही सामन्यांत छाप पाडण्याची संधी होती. पण, मोक्‍याच्या वेळी आपले खेळाडू कामगिरी उंचावण्यात कमी पडले. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी अचूक उठवला. अर्थात, दोन्ही सामन्यांत आपल्या खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही हे मान्य करायलाच हवे. दोन्ही सामन्यातील चुका सुधारून आता तिसऱ्या कसोटीत खेळ करावा लागेल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news test cricket match