कसोटी सामना आता चार दिवसांचा

रॉयटर्स
Friday, 15 December 2017

दक्षिण आफ्रिका-झिंबाब्वे संघांदरम्यान होणार पहिला प्रयोग
दुबई - कसोटी क्रिकेट सामना आता चार दिवसांचा खेळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेदरम्यान पुढील महिन्यात चार दिवसांचा पहिला कसोटी सामना खेळविला जाणार असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने त्याला अधिकृत दर्जा दिला आहे. 

आतापर्यंत कसोटी सामना पाच दिवसांचा खेळविला जातो. आयसीसीने मात्र त्याचा एक दिवस कमी करून रोज खेळविल्या जाणाऱ्या षटकांमध्ये वाढ केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेदरम्यान २६ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर हा सामना पोर्टएलिझाबेथ येथे दिवस-रात्र खेळविला जाईल. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी या बदलाचे स्वागत केले आहे.

पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट अलीकडे कंटाळवाणे होत असल्याचा दावा केला जात असल्याने आयसीसी कसोटी क्रिकेटला आकर्षक करण्याचे विविध प्रयोग करत आहे. कसोटी विश्‍वकरंडकाचीदेखील कल्पना त्यांच्या समोर असली, तरी ती अजून प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. आणखी एक पर्याय म्हणून दिवस-रात्र कसोटी सामनाही खेळविण्यास सुरवात केली आहे. पाच दिवसांपेक्षा एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षकवर्ग मैदानाकडे अधिक वळत आहेत. अशातच काही पदाधिकारी आणि माजी खेळाडूंनी कसोटी सामना चार दिवसांचा खेळविला जावा, असे मत मांडले. त्यामुळे आता कसोटी लोकप्रिय करण्यासाठी हा नवा पर्याय या वेळी सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर वापरला जाणार आहे.

चार दिवसांमुळे झालेले बदल
रोजच्या दिवसाच्या खेळात अर्ध्या तासाने वाढ
दिवसभरात ९० ऐवजी होणार ९८ षटके
फॉलोऑन देण्यासाठी १५० धावांची आघाडी पुरेशी (पाच दिवसांच्या क्रिकेटमध्ये २००)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Test match is now four days