विदर्भाला विजयाची गुढी उभारण्याची संधी

Sunday, 18 March 2018

नागपूर - मध्यमगती गोलंदाज रजनिश गुरबानीच्या भेदक माऱ्यापुढे विदर्भाच्या ७ बाद ८०० या धावसंख्येचा पाठलाग करताना शेष भारताची चौथ्या दिवसाअखेरीस ६ बाद २३६ अशी अवस्था झाली. वानखेडेचे शतक वैशिष्ट्य ठरले. शेष भारताचे केवळ चार गडी शिल्लक असल्यामुळे यजमान विदर्भ क्रिकेटप्रेमींना रविवारी गुढीपाडव्याची अविस्मरणीय भेट देणार, यात मुळीच शंका नाही. गुरबानीने शेष भारताची दाणादाण उडविताना कर्णधार करुण नायरसह चार खंदे फलंदाज बाद केले. 

धावफलक
विदर्भ पहिला डाव : (५ बाद ७०२ वरून) अपूर्व वानखेडे नाबाद १५७, आदित्य सरवटे झे. भरत गो. अग्रवाल १८, अक्षय वखरे झे. व गो. विहारी ०, रजनिश गुरबानी नाबाद २२, अवांतर १८, एकूण २२६.३ षटकांत ७ बाद ८०० डाव घोषित.  बाद क्रम : ६-७४१, ७-७४४. गोलंदाजी : सैनी ३६-८-१२३-०, सिद्धार्थ कौल ३६-७-९१-२, अश्‍विन ४३.३-२-१२९-१, नदीम ४६-५-१६०-१, यादव ४८-३-२०२-१, समर्थ ५-०-२६-०, विहारी ८-०-३२-१, अग्रवाल ४-०-२१-१. 

शेष भारत ः पहिला डाव : पृथ्वी शॉ झे. वानखेडे गो. आदित्य ठाकरे ५१, आर. समर्थ झे. सरवटे गो. गुरबानी ०, मयंक अग्रवाल झे. रामास्वामी गो. उमेश यादव ११, करुण नायर झे. वाडकर गो. गुरबानी २१, हनुमा विहारी खेळत आहे ८१, एस. भरत त्रि. गो. गुरबानी ०, आर. अश्‍विन झे. फजल गो. गुरबानी ८, जयंत यादव खेळत आहे ६२, अवांतर २, एकूण ७७ षटकांत ६ बाद २३६. गडी बाद क्रम : १-४, २-२१, ३-७७, ४-९०, ५-९०, ६-९८. गोलंदाजी : उमेश यादव १४-२-४५ -१, रजनिश गुरबानी १३-२-४६-४, आदित्य ठाकरे ११-४-३५-१, आदित्य सरवटे २०-५-५५-०, अक्षय वखरे १८-२-४२-०, आर. संजय १-०-११-०.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news vidarbha cricket