देशाला विरोध करणाऱ्यांची गय करणार नाही - कोहली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 April 2018

नवी दिल्ली - ‘काश्‍मीरमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे,’ असे विधान करणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा भारतातून विशेषतः क्रिकेट क्षेत्रातून चौफेर समाचार घेण्यात आला आहे. आमच्यासाठी देशहित सर्वोच्च स्थानी आहे, अशा शब्दांत भारतीय कर्णधार विराट कोहलीने आफ्रिदीला सुनावले आहे.

केवळ विराट कोहलीच नव्हे, तर माजी कर्णधार कपिलदेव यांनीही आफ्रिदीच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. देशाचे हित आम्ही नेहमीच जपत आलो आहोत आणि त्याला जर कोणी विरोध केला तर मी त्याची गय करणार नाही, असे सडेतोड मत विराटने व्यक्त केले. ‘आफ्रिदी, तू तुझ्या पाकिस्तानी सैन्याला काश्‍मीरमधील छुपे युद्ध आणि घुसखोरी थांबवायला सांग’, असे ट्‌विट सुरेश रैनाने केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news virat kohli