फेक फिल्डिंगमुळे कोहली संतापला

पीटीआय
Sunday, 19 November 2017

कोलकता - श्रीलंका संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फेक फिल्डिंग केल्यानंतरही श्रीलंकेने त्यांना दंड करणे टाळल्यामुळे विराट कोहली संतापला होता. 

कोलकता - श्रीलंका संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फेक फिल्डिंग केल्यानंतरही श्रीलंकेने त्यांना दंड करणे टाळल्यामुळे विराट कोहली संतापला होता. 

भारतीय डावाच्या ५३ व्या षटकात भुवनेश्‍वरने चेंडू कव्हरमधून पुश केला. तो दुसऱ्या धावेसाठी परत येत असताना कव्हरमधील दिनेश चंडीमल झेपावला. त्याचे हे कृत्य चेंडू रोखण्यासाठीच आपण झेपावत आहोत, हे दाखवणारे होते. प्रत्यक्षात चेंडू त्याच्या जवळपासही नव्हता. आयसीसीच्या नव्या नियमानुसार यास फेक फिल्डिंग असे संबोधले जाते; मात्र, पंच निगेल लाँग आणि जोएल विल्सन यांनी कोणतीही पेनल्टी दिली नाही. हे पाहून कोहली संतापला. त्याने टीव्ही कॅमेऱ्याकडे पाहून पाच दंड धावा ही खूण केली.

आयसीसीने नुकतेच नियमात बदल केले आहेत. त्यानुसार चेंडू जवळपास नसतानाही झेपावत फलंदाजांना गोंधळात टाकणाऱ्या क्षेत्ररक्षकांबद्दल संघास धावांचा दंड करण्याचे ठरले आहे. नुकताच याबद्दल ऑस्ट्रेलियातील जेएलटी कप स्पर्धेत क्वीन्सलॅंड बुलच्या मॅर्नस लॅबुशगेन याला फेक फिल्डिंग केल्याबद्दल शिक्षा करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news virat kohli cricket