कोहली आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 February 2018

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेत तुफान फॉर्ममध्ये असणारा भारतीय कर्णधार विराट कोहली कारकिर्दीत आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. या वेळी तो दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नाही, तर थेट सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकण्याची, तर रिचर्ड्‌सच्या विक्रमाची बरोबरी करण्याची त्याला संधी आहे. 

कोहलीने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत १३ डावांत ८७० धावा केल्या आहेत. एका मालिकेत सर्वाधिक ९७४ धावा करण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर असून, कोहलीला त्यासाठी १०४ धावांची गरज आहे. ब्रॅडमन यांनी १९३० मध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत या धावा केल्या होत्या. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. 

भारताच्या दौऱ्यातील अजून दोन टी- २० सामने बाकी आहेत. त्यापैकी दुसरा सामना उद्या होणार आहे. कोहली या सामन्यात विश्रांती घेण्याची दाट शक्‍यता आहे. असे झाल्यास त्याला अखेरच्या सामन्यात शतकी खेळी करावी लागेल. 
या दोन सामन्यांत कोहलीने १३० धावा केल्या, तर त्याचा विक्रम हा क्रिकेट विश्‍वात आढळपद राहू शकतो. एका दौऱ्यात एक हजार धावा करण्याचा विक्रम सर व्हिव रिचर्ड्‌स यांच्या नावावर आहे. त्यांनी विंडीज संघाच्या १९७६ मधील इंग्लंडच्या दौऱ्यात १० डावांत १०४५ (चार कसोटींत ८२९ आणि ३ एकदिवसीय सामन्यात २१६) धावा केल्या होत्या. 

भारताने कसोटी सामन्यांची मालिका १-२ अशी गमावली असली तरी, सर्वाधिक २८६ धावा कोहलीनेच केल्या आहेत. कसोटीत त्याची सरासरी ४७.६६ होती. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत त्याने ५५८ धावा केल्या आहेत. पहिल्या टी-२० सामन्यात त्याने २६ धावा केल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news virat kohli cricket world record