‘क्षेत्ररक्षणात सुधारणा व्हायला हवी’

सुनंदन लेले 
मंगळवार, 6 जून 2017

बर्मिंगहॅम - आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका कायम राखली. विजयसुद्धा निर्विवाद वर्चस्वासह मिळविला. मात्र, यानंतरही भारतीय कर्णधार विराट कोहली याने संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या दर्जाबद्दल नापसंती व्यक्त केली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विराटने भारतीय खेळाडूंचे क्षेत्ररण सुधारणा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

आपले म्हणणे अधिक सविस्तर मांडताना कोहली म्हणाला,‘‘पाकिस्तानच्या सामन्यासाठी ज्या काही योजना आम्ही बनवल्या होत्या, त्याची झेरॉक्‍सच जणू मैदानावर उतरली. फलंदाजी आणि गोलंदाजांच्या प्रयत्नांना पूर्ण मार्क देतो; पण क्षेत्ररक्षणात सुधार व्हायला हवा. ही अशी एक आघाडी आहे की ज्यात भारतीय संघाला सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. रवींद्र जडेजाने मलिकला केलेले धावबादचे यश वगळता आमचे क्षेत्ररक्षण सुमार झाले, हे मान्य करावेच लागेल.’’

फलंदाजांचे कौतुक करताना कोहलीने सर्वांचेच कौतुक केले. तो म्हणाला,‘‘रोहित, शिखरकडून आम्हाला चांगली सुरवात मिळाली. रोहितने जम बसवण्यास वेळ घेतला; पण नंतर त्याने मोठी खेळी केली. शतकापासून तो वंचित राहिला. तो धावबाद झाला. त्याची बॅट क्रीझमध्ये खूप आत होती; पण सूर मारल्याने ती पुढील बाजूने हवेत राहिली. दुर्दैवाने तो बाद झाला. त्यानंतरही धावगती तशी कमीच होती; पण युवराजने माझ्यावरील दडपण दूर केले. युवराजने लौकिकास साजेशी खेळी केली. हार्दिकनेही दाखवलेले धाडस कमालीचे होते.’’

हवामान आणि खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच संघ निवडल्याचे सांगताना कोहलीने अश्‍विनला वगळल्याचे समर्थन केले. तो म्हणाला,‘‘संघ निवडताना मला कठीण गेले. अश्‍विनसारख्या गोलंदाजाला संघाबाहेर ठेवणे कठीण असते; पण एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर चेंडू योग्य जागी टाकला, तर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्याचबरोबर पावसाळी हवामान या सगळ्याचा विचार करूनच हार्दिकसह आम्ही आणखी तीन वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला.’’

Web Title: sports news virat kohli Field improvement